AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा खाऊसाहेब जिकडे गेला तिकडे बट्ट्याबोळ! आता शाहा सेनेत गेला, त्यांचंही सरकार… उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्ला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू ठेवला असून, आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. त्यांनी शिर्डी येथील सभेत बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हा खाऊसाहेब जिकडे गेला तिकडे बट्ट्याबोळ! आता शाहा सेनेत गेला, त्यांचंही सरकार... उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्ला
Bhausaheb WakchaureImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 29, 2026 | 1:27 PM
Share

काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन खासदार शिल्लक राहिले आहेत. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी दौरा सुरु केला आहे. त्यांनी बंडखोर खासदारांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांची भेट घेतली. आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना शिर्डीतील खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उल्लेख खाऊसाहेब करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या शहा सेना पंतप्रधान पदाचा निर्णय घेण्याची वेळ आली तर अमित शाहांना पाठिंबा दिली. तुझ्या (फडणवीस) नेतृत्वात भाजप लढली तू ९ खासदार निवडून आणले, शहा सेनेचे १३ खासदार आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल बोलणार नाही असं फुटीर खासदार म्हणतातय. काय बोलणार. लोक तुला जोड्याने मारतील. म्हणे उद्धव ठाकरे देव माणूस आहे. तुम्ही साईबाबांच्या मंदिरात बाबांचे आशीर्वाद घ्यायला जाता की नैवैद्याकडे असतं. हा खाऊसाहेब आपल्याकडे नैवेद्य खायला आला होता. त्याचं लक्ष तिकडे होतं.

‘मला या आधी खाऊसाहेबांच्या भानगडी कुणी सांगितल्या नव्हत्या’

पुढे ते म्हणाले, चूक माझी आहे. मला या आधी खाऊसाहेबांच्या भानगडी कुणी सांगितल्या नव्हत्या. या सहाही खासदाराच्या भानगडी कुणी सांगितले नाही. २०१४ रोजी खाऊसाहेब गेले होते. २०२४मध्ये ज्याने आणलं तेही तिकडे गेले. यांचं आधीच ठरलं होतं. खासदार तिकडे गेला, त्याला आणणारा तिकडे गेला असला तरी त्याला निवडून देणारा शिवसैनिक इकडे आहे. साधे शिवसैनिक आहेत. शेतकरी आहेत. त्यांनी पदरमोड करून त्याला निवडून दिलं. तो होता कुठे?

राज्यात आणि देशात नेभळट कारभार सुरू आहे. फोडाफोडी सुरू आहे. नीटचा पेपर फुटला. तुमचीही मुलं नीटला असतील. त्यांच्या अपेक्षाचं काय? शेतकऱ्याकडे बैल नाही. पण हे नालायक, नीच लोकं खासदार फोडायला लागले आहेत. बातमी आल्यावर बैल दिला. बैल कशाला दिला. एखादा खासदार द्यायचा. मंत्री द्यायचा ना. माजलेले आहेत ते. बैल दिला तोही नांगराच्या भाराने बसला. बैलाला नांगराचा भार पेलवत नाही. पण शाहा सेनेलाला पैशाचा भार पेलवत नाही. कालपर्यंत टीईटीचा पेपर फुटला. तुमच्या संतापाला वाचा का फुटत नाही? हा प्रश्न विचारायला आलो आहे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका