AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांच्या अटकेसाठी दंड थोपटले होते, तेव्हा आम्ही कुणाच्या मध्यस्थासाठी गेलो नाही : उद्धव ठाकरे

मला कुणाचे वाईट होत असताना आनंद होत नाही, काल पवार कुटुंबाबत घडलं, जे गेले 50 वर्षे आपल्याशी जसे वागले त्यांचे काय झालं? त्यांना परस्पर उत्तर मिळत आहेत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेबांच्या अटकेसाठी दंड थोपटले होते, तेव्हा आम्ही कुणाच्या मध्यस्थासाठी गेलो नाही : उद्धव ठाकरे
| Updated on: Sep 28, 2019 | 1:06 PM
Share

मुंबई : मला कुणाचे वाईट होत असताना आनंद होत नाही, काल पवार कुटुंबाबत घडलं, जे गेले 50 वर्षे आपल्याशी जसे वागले त्यांचे काय झालं? त्यांना परस्पर उत्तर मिळत आहेत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

हा महाराष्ट्र कुणाशी सुडाने वागत नाही. आम्ही कुणाशी सुडाने वागणार नाही. पण आसूड ओढतो. असाच एक क्षण आपल्यावर आला होता, बाळासाहेबांना अटक करण्यासाठी दंड थोपटले होते. उस्फूर्तपणे जनता रस्त्यावर उतरली होती. सरकार कुणाचे काय होते ते स्पष्ट आहे. आम्ही कुणाच्या मध्यस्थीसाठी गेलो नव्हतो. न्यायमूर्ती म्हणाले केसच होऊ शकत नाही. बाळासाहेब कुठले डायरेक्टर नव्हते…फायली अफरातफर नव्हती. हिंदूंचे रक्षण करणे हा गुन्हा होता ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत, शरद पवारांच्या ईडी कार्यालय भेटीवर भाष्य केलं.

10 वर्ष जुने प्रकरण काढून शिवसेनाप्रमुखांवर गुन्हा दाखल केला होता. पोलीस आणि सत्ता हातात असेल तर काहीही करू शकतो.न्यायाधीशांनी अटक होऊ शकत नाही असं म्हणून खटला निकाली काढला.त्यावेळी कोणीही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही, आम्हाला त्याची गरजही नाही. शिवसेनाप्रमुख एक दिवस स्वत:च कोर्टासमोर हजर झाले होते आणि जाब विचारला की सांगा माझा गुन्हा काय होता. असाच एक क्षण आपल्यावर आला होता, काही लोकांनी शिवसेनाप्रमुखांना अटक करण्यासाठी दंड थोपटले होते. सूडाने वागलेलं हा महाराष्ट्र पसंत करत नाही. जे आपल्याशी जसे वागले, तीच परस्थिती त्यांच्यावर आली आहे, त्यांचे वाईट व्हावं अशी मी अजिबात चिंतत नाही. आपण जे कमावले आहे ते संघर्ष करून कमावलेले आहे. कोणाचे वाईट होत असताना मला आनंद होत नाही – उद्धव ठाकरे

288 इच्छुकांना बोलावलं, स्वबळाची चाचपणी?

यावेळी कुठल्याही परिस्थितीत सत्ता हवी. 288 मतदार संघातील इच्छुकांना बोलवले. म्हणजे काय युती तुटणार? मी का बोलू नये इच्छुकांशी? न्याय हक्कासाठी लढलो तर लोक डोक्यावर घेऊन सत्ता देतात. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारच पण चिंतामुक्त करण्यासाठी म्हणून सत्ता हवी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री

मी एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री तख्तावर बसवून दाखवेन, हा शिवसेनाप्रमुखाना शब्द दिला. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असं आवाहन त्यांनी केलं.

सर्व इच्छुकांना सांगतोय, तुमच्या इच्छाचा आदर करतो. 288 मतदारसंघात तयारी झाली आहे. आता 2014 नाही राहिलं. अनुभवातून आलो आहे. आपली ताकद त्यांच्या मदतीची नाही राहिली तर काय फायद्याचं? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले.

दगा देणार नाही

जागा वाटपाचा प्रकार शिवसेनेची जिथे ताकद आहे तर सत्तेत खेचाखेची नको. गणपती झाले आता नवरात्रीत मंडप मोडणारा मी नाही. होय लोकसभेत आपण यू टर्न मारला. माझ्या शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास आहे. मला जागा वाटपानंतर बंडखोरी चालणार नाही.गद्दारी नको. जसे शिवसेनेच्या जागाबाबत तसे भाजपच्या जागांबाबतही. आम्ही दगा देणारी माणसे नाही. मुठी आवळून वचन द्या गद्दारी करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादीमुळे आनंद  नाही

राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय त्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटणार नाहीत. काँग्रेसच्या बाबतही तेच.

शेती करणार नाही

मी राजकारण सोडणार नाही, शेती करणार नाही, मी मुख्यमंत्री बसवून दाखवेन, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला. अजित पवारांनी  मुलगा पार्थला राजकारण सोडून शेती किंवा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.