Uddhav Thackeray : राज्यात कोरोनावरुन गोंधळ, पटोले म्हणतात मुख्यमंत्र्यांना कोरोना, वडेट्टीवार म्हणतात लागण नाही, कोरोनावरुन मतभेद

राज्यात कोरोनावरुन गोंधळ दिसून येतोय.

Uddhav Thackeray : राज्यात कोरोनावरुन गोंधळ, पटोले म्हणतात मुख्यमंत्र्यांना कोरोना, वडेट्टीवार म्हणतात लागण नाही, कोरोनावरुन मतभेद
राज्यात मध्यावधी निवडणुका होणार?, नियम काय सांगतो?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 1:32 PM

मुंबई :  राज्यात कोरोनावरुन (Corona) गोंधळ दिसून येतोय. आधी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नाना पटोले (Nana Patole) म्हणतात मुख्यमंत्र्यांना कोरोना, तर विजय वडेट्टीवार म्हणतात लागण नाही, असा मतभेदही कोरोनावरुन दिसून येतोय. महाराष्ट्रात एकीकडे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राजकारणात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं दिसतंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लागण झाल्यासंदर्भात वेगवेगळी वक्तव्य समोर येतायेत. विजय वडेट्टीवार म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली नाही. तर कमलनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलंय. यामुळे कोरोनातही राज्यकर्त्यांचा झोल असल्याची चर्चा सध्या आहे. कारण, एकच माहिती वेगवेगळी कशी दिली जाते, असा देखील सवाल करण्यात येतोय.

राज्यपालांना कोरोनाची लागण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोना सदृष्य लक्षणं दिसू लागल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली. रिलाईन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय वारेही वेगानं वाहू लागलेत. या सगळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. त्यातच एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते. दुपारी घेण्यात येणाऱ्या या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, अशी शक्यता होती. पण त्याआधीच मोठी घडामोड समोर आली असून आता एकनाथ शिंदे मुंबईला जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे-राज्यपालांच्या भेटीत अडथळा?

राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटानं बंड केला असून शिंदे आज राज्यपालांना भेटणार आहेत. ते यासाठी मुंबईत येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी राज्यपालांना कोरोनाची लागण झाली आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.