AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही ठाकरे एकत्र…उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचा टिझर आला!

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाची सध्या चर्चा चालू झाली आहे. कारण संजय राऊतांनी या मुलाखतीचा टिझर सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

दोन्ही ठाकरे एकत्र...उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचा टिझर आला!
uddhav thackeray interview
| Updated on: Jul 19, 2025 | 6:08 PM
Share

Uddhav Thackeray Interview : खासदार तथा शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाचे संपादक असलेल्या संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पाहिला भाग प्रसिद्ध झाला असून यामध्ये त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या विधानांमुळे राजकारण तापले आहे. त्यांनी भाजपा, एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. असे असतानाच आता या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचा टिझर समोर आला आहे. या टिझरमध्येही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाची नीति यावर भाष्य केले असून राज ठाकरे यांच्यावरही भाष्य केले आहे.

राऊतांचे रोखठोक प्रश्न, ठाकरेंची बेधडक उत्तरं

खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचा टिझर प्रसिद्ध केला आहे. त्यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राऊत ठाकरेंना वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसत आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी तेवढ्याच बेधडकपणे या प्रश्नांची उत्तरं दिल्याचे दिसतेय.

राज ठाकरेंविषयी विचारला प्रश्न

काही दिवसांपूर्वी मराठी विजयी मेळाव्यानिमित्त मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते. त्यांनी एकाच मंचावर येऊन भाषण केले होते. त्यामुळेच आता भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. मुलाखतीच्या पहिल्या भागात त्यांनी संघर्ष करायला आता राज ठाकरेही सोबत आले आहेत, असे भाष्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच मेळाव्याबाबत संजय राऊत यांनी एक प्रश्न विचारला आहे. उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाचेही उत्तर दिले आहे. हे उत्तर मात्र नेमके काय दिले आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे उत्तर नेमके काय आहे? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

संजय राऊतांनी काय प्रश्न विचारला?

20 वर्षांच्या कालखंडात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत, असं संजय राऊत बोलताना दिसत आहेत. याच एकत्रि‍करणावर त्यांनी ठाकरेंना प्रश्न विचारलाय. ठाकरेंनी या प्रश्नाचे उत्तर नेमके काय दिले आहे? हे अद्याप समोर आलेल नाही. मात्र गुजरातमध्ये आम्ही जुगजराती आहोत. बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत. पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत, असे उद्धव ठाकरे बोलताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी राज ठाकरेंविषयी नेमके काय भाष्य केलेय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरही भाष्य

दरम्यान, त्यांनी आपल्या या मुलाखतीत मुंबईत होत असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरही भाष्य केलंय. उद्धव ठाकरे नेमकं काय-काय बोललेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.