AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे बोलून दाखवतो ते करुन दाखवते, त्याला आता मोदीच साक्ष…का म्हणाले उद्धव ठाकरे

uddhav thackeray | अशोक चव्हाण यांचे वडील शंकराव चव्हाण, श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तर घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहे. ही तीन पाट लोक तुम्हाला चालतात. परंतु हिंदुत्ववादी शिवसेनेची घराणेशाही चालत नाही.

उद्धव ठाकरे बोलून दाखवतो ते करुन दाखवते, त्याला आता मोदीच साक्ष...का म्हणाले उद्धव ठाकरे
uddhav thackeray
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 14, 2024 | 11:32 AM
Share

कोपरगाव, शिर्डी, मनोज गाडेकर, दि. 14 फेब्रुवारी 2024 | चुकीला माफी असते मात्र गुन्हयाला माफी नसते. मागील वेळेस तुम्हाला हा खासदार नको होता. परंतु शिवसेने दिला म्हणून तुम्ही निवडून दिला. आता त्याला गाडलेच पाहिजे. भगव्याबरोबर अनेकांनी गद्दारी केली. त्यानंतर भगवा तेजाने उभा राहिला आहे, अशी जोरदार टीका शिवसेना उभाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे नाव न घेता जोरदार हल्ला केला. त्याच्या हल्ल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुटले नाही. आम्ही केलेल्या कामांचे उद्धाटन करण्यासाठी नरेंद्र मोदी येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

मोदी साक्ष…असे का म्हणाले उद्धव ठाकरे

निळकंठे धरणास पाण्याचा विषय कोणी सोडवला. त्यासाठी पैसे आम्ही दिले. आता काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धाटनासाठी येतील. मुंबईतील वरळी ते मरीन ड्राइव्ह म्हणजेच मुंबई कोस्टल रोड प्रकल्प मुंबई मनापच्या पैशांतून उभा राहिला आहे. तो प्रकल्प आमचा आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी येणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे मोदी उद्धव ठाकरे यांच्या कामाला साक्ष ठरत असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

ही घराणेशाही नाही का

अशोक चव्हाण यांचे वडील शंकराव चव्हाण, श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तर घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहे. ही तीन पाट लोक तुम्हाला चालतात. परंतु हिंदुत्ववादी शिवसेनेची घराणेशाही चालत नाही. हो माझी घराणेशाहीच, घराणे आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे ही माझी घराणेशाही आहेच. माझ्यावर आरोप करणारे घराणेदाज नाही. त्यांच्या कुटुंबाचा पत्ता नाही. ते आरोप करत आहे. जर शिवसेना प्रमुखांनी मोदीं यांच्या पाठीवर हात ठेवला नसते तर आज मोदी दिसले नसते, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारस का लागू नये

स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला. पण त्यांच्या आयोगाने शेतकऱ्यांसाठी शिफारस केलेल्या‌ गोष्टी लागू केल्या‌ का ? तिकडे दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जे सैनिक देशासाठी लढतात त्यांना शेतकऱ्यांच्या विरोधात उभे ‌केले जात आहे. मन की बात, जन की बात, ऐकले जात नाही. स्वाभिनाथन यांना राष्ट्रपती करा असे आम्ही म्हणत होतो. परंतु ते केले नाही. आता जात – पात धर्म बाजूला ठेवून तुम्ही देशाचा तिरंगा आणि लोकशाही ‌टिकवण्यासाठी‌ एकत्र यायला हवे. लोकसभा आणि विधानसभेला शिवसेनाच वाघच निवडून ‌येईल.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच