बाळा सावंत घरचा माणूस, भावनिक नातं तोडू नका, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतरही तृप्ती सावंत बंडखोरीवर ठाम

नाराज झालेल्या वांद्रे पूर्वच्या विद्यमान शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तृप्ती सावंत यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी 'मातोश्री'वरुन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता.

बाळा सावंत घरचा माणूस, भावनिक नातं तोडू नका, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतरही तृप्ती सावंत बंडखोरीवर ठाम
Follow us
| Updated on: Oct 07, 2019 | 1:53 PM

मुंबई : राज्याच्या विविध भागातील बंडोबांना थंड करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या अंगणातील बंडखोरी रोखण्यात अपयशी झालेले दिसत आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झालेल्या तृप्ती सावंत अपक्ष उमेदवारीवर ठाम (Uddhav Thackeray requests Trupti Sawant) आहेत. बाळा सावंत यांच्याशी असलेल्या घरच्या संबंधांची आठवण करुन देऊनही तृप्ती सावंत यांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दाखवली नाही.

शिवसेनेकडून मुंबईचे महापौर विश्वानाथ महाडेश्वर यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तृप्ती सावंत यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी ‘मातोश्री’वरुन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता.

‘वरुण सरदेसाई यांनी आपल्याला फोन करुन उद्धव ठाकरेंना तुम्हाला भेटायचं असल्याचा निरोप दिला होता. त्यानंतर काल ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्याशी आपली भेट झाली. जेमतेम पाच मिनिटं ही भेट झाली. त्यामुळे माझं म्हणणं त्यांच्यापुढे नीट मांडता आलं नाही. भेटीचा जास्त वेळ मिळाला असता, आणि माझी बाजू नीट मांडण्याची संधी मिळाली असती, तर मी कदाचित उमेदवारी मागे घेण्याचा विचार केला असता’ असं तृप्ती सावंत (Uddhav Thackeray requests Trupti Sawant) यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

‘मातोश्री’च्या अंगणात थेट उद्धव ठाकरेंना शिवसेना आमदाराचं चॅलेंज

तृप्ती सावंत तूर्तास अपक्ष उमेदवारीवर कायम आहेत. अजून निवडणूक आयोगाकडून निशाणी न मिळाल्याने प्रचार सुरु केला नसल्याचं तृप्ती सावंत यांनी ‘tv9 मराठी’ला सांगितलं.

दरम्यान, तृप्ती सावंत ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या तेव्हा मी स्वतः तिथे हजर होतो, अशी माहिती शिवसेनेचे आमदार अॅड अनिल परब यांनी दिली. बाळा सावंत यांचे ‘मातोश्री’शी जे संबंध होते, ते पाहता ‘बाळा आमच्या घरचा माणूस होता. त्याच्या कुटुंबियांना सांभाळणे ही शिवसेनेची जबाबदारी आहे. त्याबाबत मला जे काही करणं शक्य आहे, ते सर्व करेन असं स्पष्ट आश्वासन उद्धव ठाकरे यांनी तृप्ती सावंत यांना दिल्याचं परब म्हणाले.

‘मातोश्री’च्या अंगणाचा तिढा सुटला, उद्धव ठाकरेंनी ठरवलं वांद्रे महापौरांचे!

बाळा सावंत यांच्या कुटुंबियांशी शिवसेनेचं भावनिक नातं आहे. हे भावनिक नातं तोडू नका अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली. निवडणुकीपेक्षा हे नातं मोठं आहे. त्यांना ‘मातोश्री’ चे दरवाजे कधीही उघडे आहेत. त्यांनी कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.

शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘वांद्रे पूर्व’ या मतदारसंघात तिढा निर्माण झाला होता. अखेर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डच्चू देत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गळ्यात  टाकली होती. काँग्रेसने वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे.

पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत विजयी

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश (बाळा) सावंत दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले होते. सावंतांनी भाजपच्या कृष्णा पारकर यांचा पराभव केला होता. मात्र 2015 मध्ये सावंत यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली.

2014 मधील निवडणुकीनंतर भाजप-सेनेची युती झाल्यामुळे शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तर भाजपने उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र नारायण राणे काँग्रेसकडून रिंगणात उतरले होते.

‘मातोश्री’च्या अंगणातील जागा पटकावण्याच्या इरेने उतरलेल्या नारायण राणे यांना पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत जवळपास 20 हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.