AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : ‘…तर तुमच्या वजनानेच बाबरी पडली असती’, फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्याच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्येच्या दाव्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावलाय. 'तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : '...तर तुमच्या वजनानेच बाबरी पडली असती', फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्याच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: May 14, 2022 | 9:17 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाचा (Hindutva) मुद्दा चांगलाच गाजतोय. अयोध्या आणि बाबरी मशिदीवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाबरी मशिद पाडली त्यावेळी अयोध्येत होतो असा दावा केला होता. तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तिथे नव्हता असा दावाही फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या याच दाव्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केलीय. ‘तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती’, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावलाय.

फडणवीसांच्या दाव्यावर जोरदार टीका

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ते म्हणतात बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हतेच. मी गेलो होतो म्हणे तिकडे. अरे तुमचं वय काय? शाळेच्या सहलीला गेला होतात? चला चला चला अयोध्येला चला, बाबरी बघायला चला… तुम्ही आमच्यावर शंका उपस्थित करताय तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केलं? देवेंद्रजी तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती. या लोकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही एक पाय ठेवला असता तरी बाबरी खाली आली असती’

बाळासाहेबांची अयोध्येतील ‘ती’ आठवणही सांगितली

‘मला आठवतंय, मी साक्ष आहे. लाखोंच्या संख्येनं सगळ्यांना अयोध्याला बोलावलं होतं. त्यात शिवसैनिकही होती. अडवाणींचा मुलाखतीचा तो व्हिडीओ आहे. ते म्हणाले की ती लोकं चढली होती ती मराठी होती. प्रमोदला सांगितलं की जा त्यांना सांग. प्रमोद गेला पण त्यांचंही ती लोकं ऐकायला तयार नव्हती. मग प्रमोदचं न ऐकणारी लोकं कोण होती? तो दिवस, तो प्रसंग मला आजही आठवतो. टीव्हीवर सुरु होतं. लोकं चढलेत आणि बाबरी पाडली बाबरी पाडली. जुनं मातोश्री होतं, धावत गेलो आणि बाळासाहेबांना सांगितलं की बाबरी पाडली. बाळासाहेब म्हणाले बाबरी पाडली अरे वा… तेवढ्यात इंटरकॉमची बेल वाजली. बाळासाहेबांनी फोन घेतला. तिकडून कुणीतरी बोलत होतं. एवढंच म्हणाले मग… चांगलंय की मग… शिवसैनिकांनी पाडलं असेल तर मला त्याचा गर्व आहे, मला अभिमान आहे. फोन ठेवला की मला म्हणाले, ही कसली याची औलाद. लोकांना बोलावतात कार सेवा करा… म्हणजे काय अयोध्येला येऊन गाड्या धुवायच्या? हे असलं नेतृत्व काय कामाचं’, अशी आठवण सांगत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची एक आठवणही सांगितली.

Follow Us
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...