Devendra Fadnavis on Ketaki Chitale: ज्येष्ठ नेत्यांबाबत काय भाषा वापरतो त्याचे भान ठेवा; देवेंद्र फडणवीसांच्या केतकीला कानपिचक्या

Devendra Fadnavis on Ketaki Chitale: ज्येष्ठ नेत्यांबाबत काय भाषा वापरतो त्याचे भान ठेवा; देवेंद्र फडणवीसांच्या केतकीला कानपिचक्या
ज्येष्ठ नेत्यांबाबत काय भाषा वापरतो त्याचे भान ठेवा; देवेंद्र फडणवीसांच्या केतकीला कानपिचक्या
Image Credit source: tv9 marathi

Devendra Fadnavis on Ketaki Chitale: पवारांवरील व्हिडीओची भाजपच्या मीडिया सेलकडून मोडतोड झालेली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

भूषण पाटील

| Edited By: भीमराव गवळी

May 14, 2022 | 7:09 PM


कोल्हापूर: अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेवरून सर्वच स्तरातून केतकीवर टीका होत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे पाठोपाठ आता भाजपनेही या पोस्टवरून केतकीला कानपिचक्या दिल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पोस्टवरून केतकीला फटकारले आहे. कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबाबत काय भाषा वापरतो याचं भान असलं पाहिजे. अलिकडे सोशल मीडियावर खालची भाषा वापरली जाते. खालच्या भाषेत टीका केली जाते. अशाप्रकारचे शब्द कुणीही वापरू नये. आता कायदा त्याचं काम करेल, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते. दरम्यान, पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकीला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिला उद्या कोर्टात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच पुणे पोलिसांनाही केतकीचा ताबा हवा आहे.

पवारांवरील व्हिडीओची भाजपच्या मीडिया सेलकडून मोडतोड झालेली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावरही टीका केली. हे खपवून घेतले जाणार नाही. छत्रपती संभाजीराजे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा छळ करणारा औरंगजेब हरामखोर सुलतान याच्या कबरीवर जाणं म्हणजे हिंदूचा नव्हे तर मुस्लिमांचाही अपमान आहे, असं फडणवीस म्हणाले.

पंकज भुजबळांचं पोलिसांना निवेदन

दरम्यान, पवारांवर निंदाजनक टीका हत्येला प्रवृत्त करणारी पोस्ट आणि त्यांचा खून करण्याबाबत भडकावून वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केली आहे. माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

ही तर जीवे मारण्याची धमकीच

टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे हिने अॅड. नितीन भावेची पोस्ट शेअर करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मिडियाद्वारे अतिशय खालच्या भाषेत निंदाजनक टीका केली आहे. या पोस्टमध्ये पवारांच्या आजाराबाबत व व्यंगाबाबत हिणविण्यात आले असून त्यांची निंदा आणि थट्टा करण्यात आली आहे. पवार साहेब हे जेष्ठ नागरिक असून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या आजाराबद्दल त्यांना हिणवणे अतिशय निषेधार्थ आणि गंभीर आहे. सदर पोस्टवर निखिल भामरे (बागलाणकर) याने “बारामतीच्या “गांधी” साठी नथुराम गोडसे तयार करण्याची वेळ आली आहे.” अशी हत्येला प्रवृत्त करणारी पोस्ट टाकली आहे. पवार साहेबांना जीवे मारण्याचा धमकीच दिली असल्याचे म्हटले आहे, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

या निंदाजनक पोस्ट व त्यावरील विविध प्रतिक्रियांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. केतकी चितळे हिच्या निंदाजनक पोस्टमुळे दोन समाजामध्ये तेढ व वाद निर्माण होऊन दंगली सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.तसेच त्यांचा नथुराम गोडसे करणे म्हणजे त्यांचा खून करण्याबाबत अतिशय गंभीर आणि भडकावू वक्तव्य केले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता वरील सर्वांवर विविध कायदेशिर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात, यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें