Uddhav thackeray | शिवसेना पळवणाऱ्या वालीचा आपल्याला वध करायचाय, उद्धव ठाकरे बरसले

Uddhav thackeray | "भगव्याशी प्रतारणा केली. त्यांचा कोणीही वाली असेल त्यांचा राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार करा. आता सर्व राममय झाले आहे. जनतेचे प्रश्न तसेच आहेत. कालचा इव्हेट झाला. राम की बात होगई अभी काम की बात करो" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav thackeray | शिवसेना पळवणाऱ्या वालीचा आपल्याला वध करायचाय, उद्धव ठाकरे बरसले
uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 1:35 PM

नाशिक : “प्रभू रामचंद्रांचा एक तरी गुण तुमच्यात आहे हे तरी कळू द्या. एक तरी गुण. प्रभू रामचंद्र एकवचनी होते. सत्य वचनी होते. ज्या शिवसेनेने तुम्हाला ज्या गादीपर्यंत पोहोचवलं, त्या शिवसेनेला दिलेलं वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे होऊ शकता. आपल्यालाही वालीचा वध करावा लागेल. कारण त्यांनी शिवसेना पळवली. भगव्याशी प्रतारणा केली. त्यांचा कोणीही वाली असेल त्यांचा राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार करा. आता सर्व राममय झाले आहे. जनतेचे प्रश्न तसेच आहेत. कालचा इव्हेट झाला. राम की बात होगई अभी काम की बात करो. अभी काम की बात करो. होऊन जाऊ द्या. कामावर चर्चा करा. तुम्ही १० वर्षात काय केलं ते सांगा आता” असं उद्धव ठाकरे यांनी विचारलं.

“समर्थ देश करायचं आहे. मग दहा वर्ष अंडी उबवत होता का? पहिल्या पाच वर्षात पंतप्रधान जगभर फिरत होते. पण अयोध्येला गेले नाही. लक्षद्वीपला गेले, मणिपूरला तर नाहीच गेले. म्हणून म्हटलं संध्याकाळी बाकीचे विषय बोलणार आहे. कामगार बेकार होत आहे. सर्वांनी नुसतं राम राम करायचं का” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

‘त्यावेळी आम्ही चोर नव्हतो’

“गेल्या वर्षभरात अमरावतीत 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पीक विमा नाही, नुकसाना भरपाई नाही. दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत. कुणाला तरी पकडतात आणि यांच्यामुळे हक्काचं घर मिळालं सांगतात. चॅनलवरही दबाव एवढा आहे की ते म्हणतील तेच दाखवतात. काही ठिकाणी केबलही बंद करतात. हिंमत असेल तर मैदानात या कोण काय आहे ते दाखवतो. हे शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. होय ही घराणेशाही. हे शिवसैनिक वारसा हक्काने मिळाले आहेत. चोरून मिळाले नाही. मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही प्रचार केला. त्यावेळी आम्ही चोर नव्हतो. आज शिवसैनिक गुन्हेगार. रवींद्र वायकर गुन्हेगार, किशोरी ताई गुन्हेगार. सुरज गुन्हेगार” असं उद्धव ठाकरे भाजपावर टीका करताना म्हणाले.

‘श्रीकृष्ण अहवाल आम्ही कचऱ्यात टाकला’

“मुंबईत दंगल पेटली तेव्हा माझ्या शिवसैनिकांनी गावागावात जाऊन संरक्षण केलं. श्रीकृष्ण अहवाल आम्ही कचऱ्यात टाकला. वाजपेंयींनी सांगितलं. नितीमत्ता ना… ऐसा नही करना चाहीए. मग घेतला आम्ही. गीता म्हणून पूजा केली. कारण त्यांना माहीत होतं यात भाजपवाले नाही सापडणार. शिवसैनिक सापडणार आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.