उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा राजकीय स्टंट : अशोक चव्हाण

राजू गिरी, टीव्ही 9 मराठी नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील लक्ष्मण किल्यावर जाऊन राम मंदिराचा आग्रह धरला. “पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. यापुढे वारंवार येणार. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे. राम मंदिराचा अध्यादेश आणा. नोटाबंदीसारखा राम मंदिराचा कायदा करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही मंदिर बनवा, मी श्रेय […]

उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा राजकीय स्टंट : अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

राजू गिरी, टीव्ही 9 मराठी नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील लक्ष्मण किल्यावर जाऊन राम मंदिराचा आग्रह धरला. “पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. यापुढे वारंवार येणार. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे. राम मंदिराचा अध्यादेश आणा. नोटाबंदीसारखा राम मंदिराचा कायदा करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही मंदिर बनवा, मी श्रेय घेणार नाही. फक्त मी रामभक्त म्हणून येईन. आता हिंदू गप्प बसणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याने वातावरण भगवंमय झालंय असलं तरी राजकीय वातावरण मात्र तापलं आहे. उद्धव ठाकरेंनी राम मंदिर बांधल्याशिवाय महाराष्ट्रात परत येऊ नये, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला, तर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या दौऱ्यावर टीका केली. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंचा हा दौरा म्हणजे राजकीय स्टंट असल्याचं म्हटलं आहे.

उद्धव यांचा दौरा हे केवळ राजकीय स्टंट आहे. रामाचं नाव घ्यायचं आणि मतं मिळवायची. हिंदू-मुस्लिमांमध्ये संघर्ष निर्माण करून मतांचं ध्रुवीकरण केलं जात असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली. 20 वर्षांपासून हेच सुरू असल्याचं चव्हाण म्हणाले.

राज्यात दुष्काळ असताना उद्धव ठाकरे अयोध्येला गेले. रामाचं दर्शनच घ्यायचं होतं, तर नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असतं, अयोध्येला जाण्याचं काय प्रयोजन आहे? असा प्रश्न देखील अशोक चव्हाण यांनी विचारला. उद्धव ठाकरे यांचा दौरा देखावा आहे, मार्केटिंगचा उद्योग असल्याचं चव्हाण म्हणाले.

उद्धव ठाकरेंचं अयोध्येत जंगी स्वागत

उद्धव ठाकरे यांचं लक्ष्मण किला परिसरात जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरे दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्ष्मण किल्ल्यावर दाखल झाले. इथे त्यांनी सहकुटुंब पूजा-अर्चा केली. मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते त्यांनी सोबत आणलेल्या चांदीच्या वीटेने. तब्बल 4 किलोची चांदीची वीट उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर आणली आहे. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदीर फीर सरकार’ अशी घोषणा देत शिवसैनिक राम मंदिरासाठी अयोध्येत आले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दुपारी दीडच्या सुमारास उत्तर प्रदेशातील फैजाबाद विमानतळावर दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या स्वागताला अनेक शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकांनी गर्दी केली. ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरे दुपारी बाराच्या सुमारास मुंबईतून अयोध्येच्या दिशेने निघाले. सुमारे दीड तासात ते फैजाबादमध्ये पोहोचले. त्यानंतर ते सहकुटुंब आधी पंचवटी हॉटेलमध्ये गेले. तिथून ते कार्यक्रमाला रवाना झाले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.