UMC election 2022 : शिवसेनेच्या प्रभावातल्या वॉर्डात यावेळी सरशी कोणाची? उल्हास नगरच्या प्रभाग 13मध्ये कोणता पक्ष ठरणार वरचढ?

महापालिकेत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत प्रथम स्थान पटकावले होते. तर शिवसेनेने दुसऱा क्रमांक मिळवला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित प्रतिसाद मागील वेळी मिळाला नव्हता. यावेळी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत लढली तर चित्र वेगळे दिसणार आहे.

UMC election 2022 : शिवसेनेच्या प्रभावातल्या वॉर्डात यावेळी सरशी कोणाची? उल्हास नगरच्या प्रभाग 13मध्ये कोणता पक्ष ठरणार वरचढ?
उल्हासनगर महापालिका, वॉर्ड 13
Image Credit source: tv9
प्रदीप गरड

|

Aug 15, 2022 | 7:30 AM

उल्हासनगर : भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या (UMC election 2022) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राजकीय वातावरण तापले आहे. सध्यातरी भाजपाच्या ताब्यात असलेल्या उल्हासनगरात यावेळी कोण बाजी मारणार, याविषयी तर्क लढवले जात आहेत. 78 जागांच्या या महापालिकेत मागील वेळी म्हणजेच 2017मध्ये 32 जागा जिंकत भाजपाने (BJP) सत्ता स्थापन केली होती. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळाली. यावेळी जागा वाढल्या आहेत. तर प्रभागरचनाही बदलली आहे. तीन सदस्यांची प्रभागरचना (Ward) असणार आहे. तर जागा 89 असणार आहेत. प्रभाग क्रमांक 13चा विचार केल्यास शिवसेनेच्या स्वप्नील मिलिंद बागुल यांचा विजय झाला होता. मात्र यावेळी प्रभागरचना बदलल्याने राजकीय गणिते बदलणार आहेत. आरक्षण बदलल्याने आपल्यासाठी योग्य असा प्रभागही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना शोधावा लागणार आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 13ची जेठानंद को-ऑप. हौसिंग सोसायटी परिसर, साई आशियाना, रतनदीप अपार्टमेंट, के. के. महल, रोचलानी हॉस्पिटल, सपना टॉकिज, आयटीआय कॉलेज, हनुमान मंदिर मागील बाजू, गौतम वाडी, जवाहर हॉटेल, मिलन नग, भवानी नगर, प्रेस बाजार, उल्हासनगर महापालिका आणि समोरील टेकडी परिसर, फ्लॉवर लाइन, श्याम सुंदर सोसायटी, खत्री भवन मागील भाग, धरमदास दरबार, बॅ. नं. 1065 परिसर

लोकसंख्येचे गणित

प्रभाग क्रमांक 13ची एकूण लोकसंख्या 18,469 एवढी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 2785 एवढी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 99 इतकी आहे.

कोण मारणार बाजी?

महापालिकेत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत प्रथम स्थान पटकावले होते. तर शिवसेनेने दुसऱा क्रमांक मिळवला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित प्रतिसाद मागील वेळी मिळाला नव्हता. यावेळी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत लढली तर चित्र वेगळे दिसणार आहे.

प्रभाग 13 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 13 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 13 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

विजयी उमेदवार (2017)

मागील वेळी याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. शिवसेनेचे स्वप्नील मिलिंद बागुल यांनी बाजी मारली होती.

हे सुद्धा वाचा

आरक्षण कसे?

प्रभागातील आरक्षण यावेळी बदलले आहे. तीन सदस्यांचा प्रभाग असणार आहे. त्याचे आरक्षणही जाहीर झाले आहे. 13 अ हा अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी तर क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें