AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोपर्यंत महिला मंत्री नाही तोपर्यंत…, देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

. पहिल्यांदा महिला मंत्रीचं घ्यायचे. जोपर्यंत महिला मंत्री नाही तोपर्यंत कोणीही कोट शिवला असला तरी त्या कोटाचा उपयोग नाही.

जोपर्यंत महिला मंत्री नाही तोपर्यंत..., देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
देवेंद्र फडणवीस
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Dec 29, 2022 | 7:47 PM
Share

नागपूर : दादा तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्री घोषणा करत होते. हे लोकं टाळ्या वाजवत होते. आता सुधारणा आहे.  तुमच्या काळात तीन पक्ष होते. राष्ट्रवादीचा मंत्री उत्तर देणार असेल तर फक्त राष्ट्रवादीचे नेते बसायचे. बाकी दोन पक्षांचे आमदार बाहेर असायचे. काँग्रेसचा मंत्री उत्तर देणार असेल, तर फक्त काँग्रेसचे आमदार बसायचे. मागण्या मान्य करून घेताना जबाबदारी असायची की, तुमचे आमदार उपस्थित ठेवा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

आमच्याकडं तसं नाही. सगळे भाजप आणि शिवसेनेचे आमदार बसलेले आहेत. तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकायला लागलात. बाक आम्ही वाजवितो. पण, तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकायला लागलात, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. नेहमी पॅकेज म्हटलं जात होतं. आता पॅकेज नाही. समग्र विकासाचा आराखडा मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केला. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आपण काही सूचना महिला मंत्र्यांच्या संदर्भात केल्या आहेत. त्या अंत्यंत गंभीरपणे घेत आहोत. आम्ही आता मंत्रिमंडळाचा विस्तार करू. मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती करणार आहोत. पहिल्यांदा  महिला मंत्रीचं घ्यायचे. जोपर्यंत महिला मंत्री नाही तोपर्यंत कोणीही कोट शिवला असला तरी त्या कोटाचा उपयोग नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात चार महिला मंत्री होत्या. आम्ही त्यापेक्षा जास्त करू शकतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. अजित पवार यांनी दिलेल्या सूचनांचा अवलंब केला जाईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

निर्यात दरवर्षी वाढतचं आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यावर त्याचा परिणाम होत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना यामुळं फायदा होत आहे. सगळ्या जिल्ह्यांमध्ये याप्रकारची  कामं हातात घेतली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी