Uttar Pradesh Assembly Elections | उत्तर प्रदेशसाठी ओवेसींचा मोठा प्लॅन, योगींना टक्कर?

एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेसात मुस्लिम-ओबीसी समीकरण बनवण्याच्या प्रयत्नात आहेत.

Uttar Pradesh Assembly Elections | उत्तर प्रदेशसाठी ओवेसींचा मोठा प्लॅन, योगींना टक्कर?
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 12:28 PM

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत (Uttar Pradesh Assembly Elections 2021) राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे (Asaduddin Owaisi And Om Prakash Rajbhar Alliance). समाजवादी पार्टीपासून ते बसपा आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी तयारीला लागली आहे. दुसरीकडे एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेसात मुस्लिम-ओबीसी समीकरण बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. या योजनेत सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर हे महत्त्वाचे भूमिका निभावत आहेत (Asaduddin Owaisi And Om Prakash Rajbhar Alliance).

ओवेसी यांनी बुधवारी लखनौ येथे ओम प्रकाश राजभर यांची भेट घेतली. राजभर यांनी नुकतेच ओबीसी समुदायच्या आठ पक्षांनी एकत्र येत भाजपविरोधात संकल्प मोर्चा नावाने युती केली आहे. या मोर्चात ओम प्रकाश राजभर यांची सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (एसबीएसपी), बाबू सिंह कुशवाहा यांची अधिकार पार्टी, कृष्णा पटेल यांची अपना दल (के), प्रेमचंद्र प्रजापती यांची भारतीय वंचित समाज पार्टी, अनिल चौहान यांची जनता क्रांती पार्टी (आर) आणि बाबू राम पाल यांची राष्ट्र उदय पार्टी यांचा समावेश आहे.

AIMIM पक्ष देखील या युतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. कारण, ओवेसींनी राजभरसोबत बिहारमध्येही निवडणूक लढवली होती. यावेळी ओवेसी यांच्या पक्षाता पाच जागा मिळाल्या होत्या. “आम्ही दोघेसोबत आहोत आणि आम्ही ओम प्रकाश राजभर यांच्या नेतृत्त्वासोबत आहोत आणि सोबत काम करु”, असं ओवेसी म्हणाले. इतकंच नाही तर त्यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष शिवपाल यादव यांच्यासोबतही युती करण्याचे संकेत दिले आहेत.

युपीमध्ये 52 टक्के ओबीसी मतं

उत्तर प्रदेशात तब्बल 52 टक्के ओबीसी मतं आहेत, असा अंदाज लावला जातो. तसं बघायला गेलं तर तिथे कुठली व्होट बँक जास्त आहे याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही. या 52 टक्के ओबीसी मतांमध्ये 43 टक्के मतं ही गैर यादव समाजाचे आहेत.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात ओबीसी वर्गाची महत्त्वाची भूमिका आहे. यापैकी 50 टक्के मतं ज्या पक्षाच्या खात्यात गेली, त्या पक्षाची सत्ता स्थापन होते, असं मानलं जातं. 2017 च्या विधानसभा आणि 2014 आणि 2019 च्या लोकसभेत मागासवर्गीयांकडून भाजपला चांगला पाठिंबा मिळाला होता. त्यामुळेच भाजप केंद्र आणि राज्यात सत्ता स्थापन करु शकली. 2012 मध्ये सपानेही ओबीसी समुदायाच्या बळावर राज्याची सत्ता मिळवली होती, तर 2007 मध्ये मायावतींनी दलितांसोबतच मागासलेल्यांच्या आधारे निवडणूक लढविली होती (Asaduddin Owaisi And Om Prakash Rajbhar Alliance).

उत्तर प्रदेशात ओबीसी व्होट बँकेत जवळपास आणखी दीडशे जाती आहेत. या जाती अति मागासवर्गीयमध्ये येतात. येथे अनेक असे लहान लहान पक्ष आहेत, जे एका विशिष्ट व्होट बँकच्या आधारे राजकारण करतात आणि मोठ्या पक्षांसोबत राजकीय समीकरणं जुळवतात. पण, यंदाच्या निवडणुकीत हे पक्ष एकमेकांचा हात पकडत असल्याचं चित्र आहे.

युपीमध्ये सर्व राजकीय पक्षांची नजर ही मागास वर्गातील मतांवर आहे. कराण गेल्या निवडणुकीत भाजपने याचं मतांच्या आधारे सत्तेत वापसी केली होती. पण, ओम प्रकाश राजभर आता भाजपापासून वेगळे झाले आहेत. ते सध्या, लहान लहान पक्षांना एकत्र करत आहेत. जर यामध्ये ओवेसींचा पक्षही सामील झाला तर सपा आणि बसपा सारख्या पक्षांसाठी मोठं आव्हान उभं होऊ शकतं. यूपीमध्ये सुमारे 22 टक्के मुस्लिम मतदार आहेत, ज्यांच्याआधारे ओवेसी यांना आपला पक्ष वाढवायचा आहे.

ओम प्रकाश राजभर यांनी मागील निवडणूक भाजपबरोबर लढविली होती आणि चार जागाही जिंकल्या होत्या. मात्र, त्यानंतर मागासवर्गीयांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत ते योगी सरकारपासून विभक्त झाले.राजभर समुदाय ही पूर्वांचलमधील महत्वाची व्होट बँक आहे.

गाझीपूर, बलिया, मऊ, आजमगड, चांदौली, भदोही, वाराणसी आणि मिरजापूरची लोकसंख्या 12 लाखाहून अधिक आहे. ओमप्रकाश राजभर यांनी या समाजाचा नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या परिसरात मुस्लिम मतांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ओवेसी आणि राजभर यांची युती यशस्वी ठरु शकते.

महायुतीच्या घोषणेदरम्यान ओम प्रकाश राजभर म्हणाले होते, ही मागासवर्गीयांच्या पक्षांची युती आहे. जिथे ज्या पक्षाचा समुदाय अधिक असेल तिथे तोच पक्ष निवडणूक लढवेल आणि अन्य पक्ष त्याला पाठिंबा देतील. या सूत्रानुसार, आमच्या महायुतीत जागावाटप केले जाईल.

अलीकडेच राजभर यांनी शिवपाल यादव यांचीही भेट घेतली होती आणि आता त्यांनी ओवेसींना मिठी मारली आहे. या भागीदारी आघाडीत या दोन पक्षांचा समावेश झाला, तर लहान पक्षांना मोठी संधी मिळू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही.

Asaduddin Owaisi And Om Prakash Rajbhar Alliance

संबंधित बातम्या :

आम्हाला RSS चं हिंदुत्व मान्य नाही, भाजपविरुद्ध दोन हात करण्यास तयार, ममता कडाडल्या

‘आम्ही तुमच्या सारख्या खोट्या कोरोना टेस्ट करत नाही’, केजरीवाल योगींवर भडकले

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.