AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचीअट, बंडखोर शिंदेगट भाजपमध्ये विलीन झाला तरच सरकार स्थापन करणार.. ? प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नाने नव्या चर्चा!

दरम्यान, गुवाहटीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांचं इनकमिंग आजही सुरुच आहे. सध्या शिंदे गटाकडे 41 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. म्हणजेच दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार शिंदे गटाकडे आहेत.

भाजपचीअट, बंडखोर शिंदेगट भाजपमध्ये विलीन झाला तरच सरकार स्थापन करणार.. ? प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नाने नव्या चर्चा!
Image Credit source:
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 23, 2022 | 10:23 AM
Share

मुंबईः बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना सोडणार नसल्याचं वारंवार सांगितलं आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज केलेल्या ट्विटने नव्या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या गटाने भाजपात विलीन व्हावे, तरच सरकार  (Maharashtra Government) स्थापन करणार, अशी भाजपने अट घातली आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. आंबेडकरांसारख्या राजकारणातील अनुभवी व्यक्तीने हे ट्विट केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईतून सुरत आणि आता गुवाहटीत असलेल्या शिंदे गटाने आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रियांमधून आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही. मात्र हिंदुत्वासोबत राहू. सत्तेसाठी गद्दारी करणार नाहीत, असं आश्वासन दिलं आहे. भाजपकडून आतापर्यंत स्पष्टपणे सत्तास्थापनेच्या संदर्भाने काहीही वक्तव्य आलेलं नाही. तरीही भाजपच्या आणि शिंदे गोटातील अंतर्गत बोलण्यांवरून प्रकाश आंबेडकरांनी हे ट्विट तर केलं नसावं? अशीही चर्चा सुरु आहे.

प्रकाश आंबेडकरांचं ट्विट काय?

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळीच तीन-तीन भाषांमध्ये ट्विट केलंय आहे. एकनाथ शिंदे गटानं भाजपाच विलीन झालं तरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, अशी अट भाजपने घातलीय का, असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय. त्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलंय

शिंदे गटाचा आकडा वाढतोय..

दरम्यान, गुवाहटीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांचं इनकमिंग आजही सुरुच आहे. सध्या शिंदे गटाकडे 41 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. म्हणजेच दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघे 14 आमदार उरले असण्याची शक्यता आहे. आज सकाळीच आशीष जैस्वाल हेदेखील तीन आमदारांसह गुवाहटीत पोहोचले आहेत.  शिवसेना प्रमुखांचे अत्यंत निकटवर्तीय सदा सरवणकर आणि दीपक केसरकर हे जैस्वाल यांच्यासह गुवाहटीत पोहोचल्याचं वृत्त नुकतच आलं आहे.

उरलेल्या आमदारांवर शिवसेना टिकणार?

एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अगदी बोटावर मोजण्याइतके आमदार राहिले आहेत. सूरतहून परतलेले आमदार नितीन देशमुख हे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जात आहेत. एकनाथ शिंदेंसोबत सर्व आमदार परततील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त 14 आमदार तर एकनाथ शिंदेंकडे 41 आमदार असल्याचा दावा केला जातोय.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार