घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या राज्याच्या पहिल्या महिला शिक्षणमंत्री, कसा आहे वर्षा गायकवाड यांचा राजकीय प्रवास?

आपल्या घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या वर्षा गायकवाड या आज काँग्रेसचा राज्यातील महत्वाचा महिला चेहरा बनल्या आहेत. 17 ऑगस्टपासून शाळा सुरु होण्याची शक्यता नुकतीच वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या समोरील आव्हानं अजून वाढणार आहेत. त्यानिमित्ताने वर्षा गायकवाड यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा

घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या राज्याच्या पहिल्या महिला शिक्षणमंत्री, कसा आहे वर्षा गायकवाड यांचा राजकीय प्रवास?
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 9:21 AM

सागर जोशी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : कोरोना संकटाच्या काळात गेल्या दीड वर्षापासून राज्यातील शाळा बंद आहेत. या काळात मुलांचं शिक्षण, शिक्षकांचं ज्ञानदानाचं कार्य, पालकांचे अनेक प्रश्न, शाळा आणि संस्थाचालकांच्या मागण्या या सगळ्यांना तोंड देत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपलं काम चोखपणे बजावल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या वर्षा गायकवाड या आज काँग्रेसचा राज्यातील महत्वाचा महिला चेहरा बनल्या आहेत. 17 ऑगस्टपासून शाळा सुरु होण्याची शक्यता नुकतीच वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या समोरील आव्हानं अजून वाढणार आहेत. त्यानिमित्ताने वर्षा गायकवाड यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा… (Political journey of Varsha Gaikwad, the first female school education minister)

वर्षा गायकवाड या काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. त्यामुळे वर्षा यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालेलं आहे. तसा राजकीय प्रवेशासाठी त्यांना फारसा संघर्ष कारावा लागला नाही. मात्र, धारावीतून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मतदारसंघ टिकून ठेवण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली. मतदारसंघात विकासाची कामे करत त्यांनी मतदारसंघावरील पकड मजबूत केली आहे. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून येऊ शकल्या. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आलं आहे. शिक्षण मंत्री होणाऱ्या त्या राज्यातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत.

वर्षा गायकवाड यांचा प्रेम विवाह

वर्षा गायकवाड यांचा प्रेमविवाह झालेला आहे. त्यांच्या पतीचं नाव राजू गोडसे आहे. राजू यांनी आयसीडब्ल्यूएमधून एमबीएची पदवी घेतली आहे. त्यांनी काही काळ बहुराष्ट्रीय कंपन्या आणि खासगी बँकांमध्ये नोकरी केली. आता ते पूर्ववेळ धारावी मतदारसंघावर लक्ष ठेवून असतात.

प्राध्यापिका वर्षा गायकवाड

वडिलांकडून राजकारणाचे संस्कार घेत गायकवाड वर्षा गायकवाड यांनी घाटकोपर इथल्या झुनझुनवाला कॉलेजमधून सायन्स मधून पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून गणित विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसंच बीएडही पूर्ण केले आहे. राजकारणात येण्यापूर्वी पाच वर्ष त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलं. बालपणापासूनच घरातून राजकारण आणि समाजकारणाचं बाळकडू मिळाल्याने त्यांनी प्रथम आणि स्नेहा या स्वयंसेवी संस्थेत काम करून समाजकारणाला सुरुवात केली.

धारावीतून विधानसभेत पाऊल

वर्षा गायकवाड यांनी 2004मध्ये सक्रिय राजकारणात पाऊल टाकलं. 2004ची विधानसभा निवडणूक त्यांनी वडिलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी विधानसभा मतदारसंघातून लढवली आणि त्यांनी विजयही मिळवला. त्यानंतर 2009मध्ये त्या पुन्हा विजयी झाल्या. त्यावेळी त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. 2010 ते 2014 या काळात त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंबई जिल्ह्यात असणारा हा मतदारसंघ शहरी असला तरी झोपडपट्टी लोकवस्तीमुळे वेगळा मानला जातो. अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय तसेच मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. इथले प्रश्न, समस्या या इतर मतदारसंघापेक्षा वेगळ्या आहेत. गायकवाड यांनी धारावीतील मतदारांच्या या समस्या सोडविणे तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्प हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले आहेत.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीचा महिला चेहरा बनलेल्या चित्रा वाघ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष कशा झाल्या? जाणून घ्या वाघ यांचा संपूर्ण राजकीय प्रवास

चाकणकरांची सून म्हणून आली आणि राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष झाली! कसा आहे रुपाली चाकणकरांचा राजकीय प्रवास?

Political journey of Varsha Gaikwad, the first female school education minister

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.