Eknath Shinde : इंधनावरील व्हॅट कमी करणार, रायगडमधील हिरकणी गावासाठी 21 कोटींचा निधी, आणखी मुख्यमंत्र्यांच्या घोषणा काय?

रायगड किल्ला ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. हिरकणी या गावानं इतिहास घडविला. हिरकणी गावाच्या विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी नागरिकांना आश्वस्त केले.

Eknath Shinde : इंधनावरील व्हॅट कमी करणार, रायगडमधील हिरकणी गावासाठी 21 कोटींचा निधी, आणखी मुख्यमंत्र्यांच्या घोषणा काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 04, 2022 | 5:21 PM

मुंबई : विश्वासदर्शक ठरावाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्यात. इंधन दरवाढीमुळं जनता नाराज होती. त्यामुळं इंधनावरील (fuel) व्हॅट लवकरच कमी करू. कॅबिनेटमध्ये असा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. रायगडमधील हिरकणी (Hirkani) गावाच्या विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. याशिवाय आत्महत्यामुक्त महाराष्ट्र (Maharashtra) करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करू, अशा महत्वाच्या घोषणा आज मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत (Vidhan Sabha) केल्या. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रायगड किल्ला ही आमची अस्मिता आहे. ज्या हिरकणीनं इतिहास घडविला. तो हिरकणी गाव वाचविण्याकरिता शासनाच्या माध्यमातून 21 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल.

इंधनावरील कर कमी करणार

जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्या. त्यानंतर पंतप्रधानांनी इंधनावरील केंद्रीय कर कमी केला होता. इतर काही राज्यांनीही व्हॅट कमी केला होता. पण, महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारनं पाच पैसेही इंधनावरील कर कमी केला नव्हता. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. हाय निर्णय शिवसेना-भाजप युतीचा आहे. यासंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या राज्यात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे बळीराजा. बांधावर जाऊन सर्वच लोकं विचारपूस करत असतात. त्याच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत. यासाठी प्रयत्न करतात. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार केला. यासाठी सर्वांच योगदान लागेल. केंद्राच्या मदतीनं राज्याला प्रगतीकडं नेऊ, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

हिरकणी गावाचा विकास होणार

रायगड किल्ला ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. हिरकणी या गावानं इतिहास घडविला. हिरकणी गावाच्या विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी नागरिकांना आश्वस्त केले.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें