AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटपटूंवर कोट्यवधीची उधळण, काँग्रेस आणि ठाकरे गटाची शिंदे सरकारवर टीका; शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे लक्ष देत…

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे प्रसाद लाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिकेटपटूंवर कोट्यवधीची उधळण, काँग्रेस आणि ठाकरे गटाची शिंदे सरकारवर टीका; शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे लक्ष देत...
| Updated on: Jul 06, 2024 | 3:37 PM
Share

Opposition on Team India Price Money : टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा महाराष्ट्र विधान भवनात मोठा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी 11 कोटी रुपये इतकी पारितोषिक रक्कम घोषित करण्यात आली. आता यावरुन राजकारण पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे प्रसाद लाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकऱ्यांना मदत करत नाहीत – विजय वडेट्टीवार

वर्ल्डकप विजेत्या टीमला खूप पैसे मिळतात. भारताची स्पोर्ट्स स्पिरिट चांगली आहे. त्यांच्या भावनांची कदर करत मुख्यमंत्री यांनी घोषणा केली. पण जर ते देशासाठी खेळत असतील, तर त्यांना पैशांची गरज काय? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होत आहे. गेल्या चार महिन्यात 1068 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. भाजप नेते त्यांना मदत करत नाही आणि खेळाडूंना 11 कोटी रुपये देतात, असेही वडेट्टीवार म्हणाले.

टीम इंडियाच्या खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज नव्हती. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी आणि छाप पाडण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. कधीही अंथरून पाहून पाय पसरावे, पाय उघड्यावर पडतील तेव्हा दिसतील, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून हा निधी द्यावा – अंबादास दानवे

तर दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारी तिजोरीतून बक्षीस देण्याची गरज नाही. त्यांनाही गरज नाही. बीसीसीआयकडे खूप पैसे जमा आहेत. त्यातून त्यांना मानधन मिळते. क्रिकेटपटूंचा आदर करायला हवा, यात काहीही शंका नाही. पण त्यासाठी एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्यापक्षा मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावा, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.

चार खेडाळूंनाही सरकारने एक कोटी द्यावे, प्रसाद लाड यांची मागणी 

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या टीकेला भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “विजय वडेट्टीवार जर म्हणत असतील की पैसे देणं चुकीचे आहे, तर ही त्यांची विकृती आहे. मी तर सोमवारी मागणी करणार की बाकीच्या चार खेडाळूंनाही सरकारने एक कोटी द्यावे आणि टीमच्या सर्व खेळाडूंचा सन्मान करावा”, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. दरम्यान यामुळे आता वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी 11 कोटी रुपये पारितोषिक रक्कम घोषित केल्याने सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा