बिहारमध्ये दुसऱ्याची बायको पळवून आणली, राज्यात अक्षता पडायच्या आधीच नवरी पळाली, वडेट्टीवारांचा दानवेंना टोला

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांना कोणाचाही बाप काढायचा अधिकार नाही, अशा शब्दात टीका केली आहे. (Vijay Wadettiwar criticize Raosaheb Danve)

बिहारमध्ये दुसऱ्याची बायको पळवून आणली, राज्यात अक्षता पडायच्या आधीच नवरी पळाली, वडेट्टीवारांचा दानवेंना टोला
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 8:51 PM

नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दानवेंना कोणाचाही बाप काढायचा अधिकार नाही, असं प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी दिलं आहे.  लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार बिहारमध्ये 2015 पासून सत्तेत होते. भाजपनं  बिहारमध्ये 2017 मध्ये नितीशकुमार यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती. हा धागा पकडत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. “बिहारमध्ये गेल्या वेळी दुसऱ्याची बायको पळवून आणली होती. राज्यातही सकाळी सकाळी गुपचूप लग्न केलं होतं, मात्र, संसार टिकला नाही, अक्षदा पडायच्या आधीच नवरी पळाली,” अशा शब्दात वडेट्टीवारांनी दानवे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. (Vijay Wadettiwar criticize Raosaheb Danve)

भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी एका सभेत राज्य सरकारला ‘चोरून लग्न केलं, संसार थाटला, मग बापाला पैसे का मागता, असं वक्तव्य केलं होतं. औरंगाबाद येथे गुरुवारी झालेल्या सभेतही दानवे यांनी ” हे मोदींकडे पैसे मागतात मी इतकंच म्हणालो की, चोरून संसार तुम्ही करता, पैसे बापाकडे मागता. आता आमच्याकडे कशाला पैसे मागता, तुमचं सरकार म्हणजे तुमची जबाबदारी आहे” असं टीकास्त्रही त्यांनी ठाकरे सरकारवर सोडलं होतं. दानवे यांच्या या वक्तव्याचा विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतलाय.(Vijay Wadettiwar criticize Raosaheb Danve)

विजय वडेट्टीवार यांनी “केंद्राचा निधी म्हणजे त्यांच्या बापाचे पैसे आहेत का?, त्यांच्या बापाने कमवून ठेवले का?”,असा प्रश्न दानवे यांना केला. “रावसाहेब दानवे येऊन जाऊन बाप काढतात, दानवे यांना विचारा त्यांचे बाप कोण आहे, कोणाचे बाप, किती बाप?”, असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय. “केंद्र सरकार राज्याला मदत करते म्हणजे उपकार करत नाही, तो आमचा हक्क आहे, एनडीआरएफ च्या निकषावर मदत दिलीच पाहिजे, दानवे यांना निकष माहीत नाहीत का? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला.

उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांच्यात आरोप प्रत्यारोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती. “तुम्ही लग्न केलं आणि आता बापाकडे पैसे कशाला मागता,” या रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले होते.” माझा बाप केंद्रात नाही. तो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो. माझा बाप महाराष्ट्राच हाच आहे, माझ्या विचारातून आणि कृतीतून वेळोवेळी त्याचे अस्तित्व तुम्हाला दिसून येईल”, असे उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील टीकेवर रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये पलटवार केला होता. “राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत आहे’, असं म्हणत भाजपाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या :

राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत, दानवेंचं ठाकरेंना उत्तर

भाजपवाल्यांनो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो, माझा बाप हा महाराष्ट्र- उद्धव ठाकरे

(Vijay Wadettiwar criticize Raosaheb Danve)

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.