मोहिते पाटलांना आम्ही फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही : अजित पवार

मोहिते पाटलांना आम्ही फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही : अजित पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशावर एक नवा खुलासा केलाय. माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटलांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली होती. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या आधी दोन दिवस आम्ही मोहिते पाटलांना फोन करत होतो, मात्र त्यांनी आमचा फोन घेतलाच नाही, असा खुलासा अजित पवार यांनी केला. पुण्यात ते बोलत होते.

राष्ट्रवादीवर नाराज होऊन विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. माढ्यातून राष्ट्रवादी आता विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना तिकीट देणार असल्याची माहिती आहे. पण आम्ही तिकीट देण्याची तयारी दाखवलेली असूनही त्यांनी पक्ष सोडला, असं अजित पवारांनी म्हटलंय.

नगरमध्येही तेच झालं. सुजयला आम्ही उमेदवारी देत होते, मात्र त्यांनी उमेदवारी घेतली नाही. दबावाचं आणि प्रलोभनाचं राजकारण सुरु आहे आणि काहींचे हात अडकले आहेत. चौकशीचा ससेमिरा यामुळे पक्ष प्रवेश होत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात असं होत नव्हतं. मात्र या पाच वर्षांच्या काळात हे होत आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.

वाचा – अखेर राष्ट्रवादीचा माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार ठरला, अधिकृत घोषणा बाकी

अजित पवार यांचं भाषण


Published On - 2:23 pm, Thu, 21 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI