मुख्यमंत्र्यांचं हसत स्वागत आणि शरद पवारांकडे बोट, विनायक मेटेंच्या देहबोलीची जोरदार चर्चा

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपूडा रविवारी (31 जानेवारी) पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा साखरपुडा झाला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. त्यामुळे या सोहळ्यात विविध राजकीय पक्षाच्या नेते मंडळींची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान […]

मुख्यमंत्र्यांचं हसत स्वागत आणि शरद पवारांकडे बोट, विनायक मेटेंच्या देहबोलीची जोरदार चर्चा
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 1:22 AM

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपूडा रविवारी (31 जानेवारी) पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा साखरपुडा झाला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. त्यामुळे या सोहळ्यात विविध राजकीय पक्षाच्या नेते मंडळींची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याचसोबत महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटेंचीही खास उपस्थिती होती. इतरवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर सडकून टीका करणाऱ्या त्यावेळी गेल्या वर्षभरात न दिसलेलं चित्र आज पाहायला मिळालं!(Vinayak Mete and Uddhav Thackeray Sharad Pawar interaction in Sanjay Raut’s daughter’s engagement).

राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आगमन होताच इतरवेळी टीकेची झोड उठवणाऱ्या विनायक मेटेंनी हात जोडून हासत त्यांचं स्वागत केलं. तसेच लगेचच त्यांच्या समोरच्या बाजूला बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बोट केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि विनायक मेटेंचं काय बोलणं झालं आणि मेटेंनी पवारांकडे बोट करुन नेमकं काय म्हटलं याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान, फडणवीस आणि राऊतांच्या गळाभेटीनेही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे एकत्रच कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावेळी मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या पत्नी उपस्थित होत्या. फडणवीस आणि दरेकर यांचं आगमन झाल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी फडणवीसांना नमस्कार केला.

फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दुसरीकडे असलेल्या संजय राऊत यांनी फडणवीसांना पाहिलं आणि ते फडणवीसांकडे आले. दोघेही समोरासमोर आल्यानंतर राऊत यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. त्यानंतर नव्या जोडप्यासह नार्वेकर आणि राऊत कुटुंबियांसोबत फडणवीसांनी फोटो काढले. त्यानंतर दरेकर यांनी पुढे होत नव्या जोडप्याला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. तेव्हा राऊतांनीही पुढे होत दरेकरांच्या हातात हात दिला.

हेही वाचा :

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात राज ठाकरेंची अनुपस्थिती! चर्चा तर होणारच

वेस्टर्न ड्रेस, केक कटिंगसह राजकीय नेत्यांची उपस्थिती, राऊतांच्या लेकीचा ‘ग्रँड साखरपुडा’

संजय राऊतांच्या लेकीच्या साखरपुड्यात फडणवीस-राऊत गळाभेट! अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ पाहा :

Vinayak Mete and Uddhav Thackeray Sharad Pawar interaction in Sanjay Raut’s daughter’s engagement

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.