AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्ष कुठलाही असो, आम्हाला तिकीट हवं, इच्छुकांची उमेदवारीसाठी मुंबईवारी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Assembly Elections Announce) बिगुल वाजला असून, राज्यात येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत नशिब आजमावणाऱ्यांची काही कमी नाही (candidates for assembly elections). अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी तयार झाले आहेत.

पक्ष कुठलाही असो, आम्हाला तिकीट हवं, इच्छुकांची उमेदवारीसाठी मुंबईवारी
Maharashtra MLA List
| Updated on: Sep 22, 2019 | 5:27 PM
Share

वाशिम : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Assembly Elections Announce) बिगुल वाजला असून, राज्यात येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत नशिब आजमावणाऱ्यांची काही कमी नाही (candidates for assembly elections). अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी तयार झाले आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाची उमेदवारी मिळविण्याकरिता अनेकांनी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरु केली आहे.

वाशिम जिल्ह्यात (Washim Constituency) विधानसभेसाठी रिसोड, वाशिम आणि कारंजा हे तीन मतदार संघ आहेत. सध्या रिसोड मतदार संघात काँग्रेस, तर वाशिम आणि कारंजामध्ये भाजपचे आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी महिनाभरापुर्वीपासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सर्वप्रथम काँग्रेसने जुलै महिन्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून विधानसभेची रणधुमाळी सुरु केली. जिल्ह्यातील तीन मतदार संघासाठी एकूण 156 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

21 आक्टोबर रोजी होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु आहेत. महायुतीकडून विधानसभा मतदार संघ वाटाघाटीच्या बैठका, सभा, बोलणी सुरु असल्याने रोज नवनवीन चर्चा कानावर पडत आहेत, त्यामुळे उमेदवार सध्या संभ्रमात आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात अद्यापही लढतीचे चित्र स्पष्ट झालेले नाही.

यावेळी आघाडी, युती आणि वंचित अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदार संघासाठी मुलाखती घेतल्या आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीसह इतर घटक पक्षाची आघाडी झाली असली, तरी भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षाच्या युतीची अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न गुलगस्त्यात आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेपेक्षा भाजपा आणि वंचितकडे उमेदवारी मागणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. मात्र, या पक्षांनी अद्याप इच्छुक उमेदवारांच्या उमेदवारीला हिरवा झेंडा दाखविलेला नाही. त्यामुळे उमेवारांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. राजकीय पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी प्रत्येक उमेदवार मुंबईवारी करुन फिल्डिंग लावत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019 नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019 अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019 अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019 मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019 मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019

संबंधित बातम्या :

भाजपमधून फुटलेला नेता राष्ट्रवादीत, शिवेंद्रराजेंसमोर तगडं आव्हान

अजित पवारांकडून पुण्यातील जागावाटपाचे सूत्र जाहीर

जेव्हा शरद पवारांची साथ सोडलेले 52 आमदार पुढच्या निवडणुकीत पडले!

पवारांनी उदयनराजेंविरोधात दंड थोपटले, साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.