आमच्याकडे मेगाभरती नाही, तर मेरीट भरती होईल : जयंत पाटील

"भाजपमधील 14 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहे. मात्र मी त्यांचे नाव फोडणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होतील," असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी (Jayant Patil Megabharti) केले.

आमच्याकडे मेगाभरती नाही, तर मेरीट भरती होईल : जयंत पाटील
Follow us
| Updated on: Nov 17, 2019 | 5:35 PM

पुणे : “भाजपमधील 14 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहे. मात्र मी त्यांचे नाव फोडणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होतील,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी (Jayant Patil Megabharti) केले. तसेच “आम्ही मेगाभरती करणार नाही. तर आमच्याकडे मेरीटने भरती होईल,” असेही जयंत पाटील (Jayant Patil Megabharti) म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात (Jayant Patil Megabharti) आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. पुण्यातील शरद पवार यांच्या मोदी बागेतील निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे.

याविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आज बोलवण्यात आली आहे. यात राज्यातील सत्तास्थापनेविषयी यावेळी चर्चा होणार आहे. या बैठकीला राज्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र शरद पवार आणि सोनिया गांधी यांची दिल्लीतील बैठक कधी होईल याची मला अद्याप काहीही माहिती नाही. या बैठकीत कोणाला पाठिंबा देण्यापेक्षा एकत्रित सरकार कसे स्थापन होईल याबाबत चर्चा होण्याची शक्यता (Jayant Patil Megabharti) आहे.”

या बैठकीत मसुद्याबाबत चर्चा होणार नाही कारण तो अद्याप फायनल झालेला नाही. दिल्लीत तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसल्यानंतर यावर चर्चा होईल असेही जयंत पाटील म्हणाले.

एनडीएतून शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत. तसेच शिवसेनेच्या बैठकीच्या आसनाची व्यवस्थाही बदललण्यात आली आहे. ते विरोधी बाकावर बसणार आहेत. अशा काही बातम्या मी ऐकल्या आहेत. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे की नाही याची अधिकृत घोषणा झाली आहे की नाही हे पाहावं लागेल.”

“भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे लवकरच गोड बातमी येईल असे वारंवार सांगत होते. मात्र त्यांची गोड बातमी अद्याप आलेली नाही. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांना कोणत्या गोड बातमीची अपेक्षा आहे याची मला काहीही माहिती नाही.” असेही जयंत पाटील (Jayant Patil Megabharti) म्हणाले.

“मला वाटत राज्यात जनतेच्या मनात असलेलं सरकार आणण्याचे काम शरद पवार करत आहेत. तो प्रयत्न करत असताना महाराष्ट्रात स्थिर सरकार येईल. यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल पण महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्याचा प्रयत्न होतं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांना राष्ट्रवादी भाजप बरोबर जाणार का असा प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले, “आम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढलो. ज्यांना विचाराने आम्ही पराभूत केलं. जे वैचारिक दृष्ट्या भिन्न विचाराचे आहेत. त्यांच्याशी किती जवळ जायचं याला काही मर्यादा असू शकतात. आमच्या पक्षासह राज्यातील जनतेला जे सरकार हवं असले तेच सरकार येईल.”

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.