Eknath Shinde: आम्हाला 50 ते 60 कोटीची निधी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना 700 ते 800 कोटी, शिंदे गटातले आमदार महेश शिंदेंचा थेट आरोप

Eknath Shinde: आमच्या तीन बैठका मुख्यमंत्र्यांसोबत झाल्या मात्र कोणताही फरक झाला नाही. अनेक गोष्टींना मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला. मात्र, त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केराची टोपली दाखवली,' असा गंभीर आरोप शिंदे गटातले आमदार महेश शिंदेंचा यांनी केलाय.

Eknath Shinde: आम्हाला 50 ते 60 कोटीची निधी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना 700 ते 800 कोटी, शिंदे गटातले आमदार महेश शिंदेंचा थेट आरोप
महेश शिंदे, आमदार
Image Credit source: twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Jun 25, 2022 | 3:43 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडतायेत. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट, असा संघर्ष रोज पहायला मिळतोय. एकीकडे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेची (shivsena) धडपड सुरू झाली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट संख्याबळ पूर्ण करून सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याचं दिसतंय. आता यातच एका आमदाराचा व्हिडीओ समोर आलाय आहे. हा व्हिडीओ सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा आहे, व्हिडीओ एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलाय. यामध्ये काही धक्कादायक खुलासे शिंदे यांनी केले आहेत. शिवसेनेच्या आमदारांना (MLA) 50 ते 60 कोटीची निधी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना 700 ते 800 कोटींचा निधी दिला जायचा, असा भेदभाव  आणि नाराजी त्यांनी समोर आणली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्टे ला देखील उपमुख्यमंत्र्यांनी केराची टोपली दाखवल्याचं महेश शिंदे यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हटलंय.

महेश शिंदे यांचा व्हिडीओ

महेश शिंदे नेमकं काय म्हणालेत?

‘सर्व शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली होती. वर्षा निवासस्थानी बैठक झाली होती. यावेळी सर्व अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या आमदारांना किती निधी दिला हे विचारण्यात आलं. यावेळी अधिकाऱ्यांनी खोटे आकडे दिले. हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत संगनमत करून हा प्रकार झाल्याचंही मुख्यंत्र्यांच्या लक्षात आलं. मात्र, यानंतर काहीच झालं नाही. त्यावेळी आम्हाला 50-55 कोटींचा निधी दिला जायचा. तर राष्ट्रवादीच्या आमदारांना 700 ते 800 कोटींचा निधी दिला जायचा. हे इतक्यावर नाही थांबलं. त्याही पुढे प्रकरण गेलं. शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात आम्ही जे राष्ट्रवादीचे उमेदवार पाठवले आहेत. त्यांना आमच्या डबल आणि त्याहीपेक्षा अधिक निधी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून दिला जायचा. मधल्या काळात आम्हाला निधी देखील दिला जायचा नाही. आम्हाला कोणत्या कार्यक्रमालाही बोलावलं जायतं नाही. आमच्या तीन बैठका मुख्यमंत्र्यांसोबत झाल्या मात्र कोणताही फरक झाला नाही. अनेक गोष्टींना मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला. मात्र, त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केराची टोपली दाखवली,’ असा गंभीर आरोप शिंदे गटातले आमदार महेश शिंदेंचा यांनी केलाय. यामुळे पुन्हा एकदा आमदारांच्या मनातील खदखद समोर आली आहे.

भेदभाव झाल्यानं नाराजी वाढली

शिवसेनेच्या आमदारांना 50 ते 60 कोटीची निधी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना 700 ते 800 कोटींचा निधी दिला जायचा, असा भेदभाव  आणि नाराजी त्यांनी समोर आणली आहे.यावरुन भेदभाव वाढल्यानं नाराजी वाढल्याचं दिसतंय.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाची नाराजी वाढतेय

एकनाथ शिंदे गटाची नाराजी वाढत जात असून आमदार आपल्या मनातील गोष्टी, नाराजी उघड करत असल्याचं दिसतंय. महेश शिंदे यांनाी देखील आपल्या मनातलं बोलून दाखवलंय. महाविकास आघाडी हे तीन पक्षाचं सरकार असल्यानं आमच्यावर भेदभाव होत आहे, हे त्यांनी लक्षात आणून दिलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें