आधी मागच्या सरकारच्या पापाचं निरसन करू; मगच 100 युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ: नितीन राऊत

नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यूत विभागाच्या आर्थिक स्थितीची माहिती देतानाच भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. तसेच राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. (nitin raut on free power for those who consume up to 100 units)

भीमराव गवळी

|

Nov 20, 2020 | 4:49 PM

मुंबई: राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम आहे. पण मागच्या सरकारने जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं आधी निरसन करून नंतरच 100 युनिट वीज माफी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यावर काम सुरू आहे, असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज स्पष्ट केलं. (nitin raut on free power for those who consume up to 100 units)

नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यूत विभागाच्या आर्थिक स्थितीची माहिती देतानाच भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. महावितरणची मार्च 2014ची अखेरची थकबाकी 14 हजार 154 कोटी होती. ही थकबाकी आता 59 हजार 14 कोटी इतकी आहे. त्यामुळे या विषयावर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

100 युनिट वीज माफी करावी असं मला वाटतं, असं मी म्हणालो होतो. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली. मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही. आताची महावितरणची आर्थिक स्थिती पाहता 59 हजार कोटींची तफावत आली आहे. मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं निरसन करूनच 100 युनिट वीज माफीचा निर्णय घेण्यात येणार असून 100 युनिट वीज माफी देण्यावर मी ठाम आहे. ही वीज मी माफ केल्याचं तुम्हीही पाहाल, असं राऊत म्हणाले.

केंद्र सरकारविरोधात आंदोलन करा

वाढीव बीजबिलाच्या मुद्द्यावरून भाजपने आंदोलन सुरू केलं असून मंत्रालयावरही मोर्चा आणण्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे?, असं राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर, भाजपने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर आनंदच होईल. कारण मी केंद्राला वारंवार पत्र लिहून ऊर्जा विभागाकडे 10 हजार कोटींच्या अनुदानाची मागणी केली. मात्र, केंद्राने त्यावर अद्यापही निर्णय घेतला नाही, त्यामुळे भाजपने केंद्राविरोधात आंदोलन करावं, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे 28 हजार कोटी रुपये दिले तर वाढीव वीज बिलाला माफी देऊ, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘महावितरणचे 67 हजार कोटी रुपये भाजप सरकारच्या काळातच थकीत’, जयंत पाटलांचा भाजपवर पलटवार

LIVE | भाजप नेत्यांनी वीजबिल घेऊन यावं, तपासून देतो, नितीन राऊत यांचे आव्हान

भाजप सरकारच्या काळात ऊर्जा विभागाचं काम उत्तम, थकबाकी असेल तर गरिबांना सवलत दिल्यामुळे- फडणवीस

(nitin raut on free power for those who consume up to 100 units)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें