मला मुख्यमंत्रीपदी राहायचं नाही, ममता बॅनर्जींचाही राजीनाम्याचा प्रस्ताव

कोलकाता : मला मुख्यमंत्रीपदी राहायचं नाही, मला राजीनामा द्यायचा आहे, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ममतांनी राजीनाम्याची भाषा केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोलकात्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममता म्हणाल्या, “मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ इच्छित आहे. मला पक्षाची अध्यक्ष म्हणून काम करायचं आहे” West Bengal CM Mamata Banerjee: I told …

मला मुख्यमंत्रीपदी राहायचं नाही, ममता बॅनर्जींचाही राजीनाम्याचा प्रस्ताव

कोलकाता : मला मुख्यमंत्रीपदी राहायचं नाही, मला राजीनामा द्यायचा आहे, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ममतांनी राजीनाम्याची भाषा केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोलकात्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममता म्हणाल्या, “मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ इच्छित आहे. मला पक्षाची अध्यक्ष म्हणून काम करायचं आहे”

नुकतंच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात भाजपने मुसंडी मारत 300 चा आकडा पार केला आहे. भाजपसह मित्रपक्षांना लोकसभेच्या 352 जागी विजय मिळाला. त्यामुळे विरोधकांचा सूपडासाफ झाला. भाजपने ममतांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 18 जागा जिंकल्या.

लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान, ममतांची तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये राडा झाला होता. अमित शाहांच्या रॅलीत दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या सर्व पार्श्वभूमीनंतर आता ममतांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला.

तिकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही लोकसभेतील पराभवानंतर राजीनामा दिला. मात्र काँग्रेस कार्यकारिणीने त्यांचा हा राजीनामा फेटाळून लावला.

राहुल गांधींचा राजीनामा

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनाम दिला. काँग्रेस कार्यकारिणीकडे हा राजीनामा सोपवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेस कमिटीने तो फेटाळला.  देशभरात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी अर्थात काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीला UPA च्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी, नाना पटोले, मोतीलाल वोरा, के सी वेणुगोपाल, रजनी पाटील, गिरीजा व्यास, मुकुल वासनिक, पी सी चाको, अशोक गहलोत, अविनाश पांडे, गुलाम नबी आजाद, मल्लिकार्जुन खर्गे, कॅप्टन अमरिंदर सिंह हे उपस्थित होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *