AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावनिक होण्याने सरकारला फरक पडत नाही, बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांना काय सल्ला दिला

सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कठीबद्ध असल्याचे वारंवार म्हटले आहे. तरीही मराठा समाजाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा आहेत असे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना भावनिक साद घातल्याने सरकारवर काही परिणाम होईल असे वाटत नाही असेही तायवाडे यांनी म्हटले आहे.

भावनिक होण्याने सरकारला फरक पडत नाही, बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांना काय सल्ला दिला
BABANRAO TAYWADE
| Updated on: Jan 20, 2024 | 1:24 PM
Share

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर | 20 जानेवारी 2024 : मराठ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा आहेत. मराठ्यांना आरक्षण देण्यास सरकार कठीबद्ध असल्याचे सांगत आहे. मराठ्यांना आज ना उद्या आरक्षण मिळणारच आहे. तरी मराठे आग्रही भूमिका घेत आहेत. त्यांनी टोकाची भूमिका घेण्याबद्दल पुनर्विचार करावा असा सल्ला ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. मराठ्यांना भावनिक साद घालण्याने सरकारला काही फरक पडत नाही. सरकारला अशा आंदोलनांना हाताळण्याचा अनुभव असतो. भावनिकतेचा सरकारवर काही परिणाम होणार नसल्याचेही तायवाडे यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई असा नारा देत आजपासून ( 20 जानेवारी ) मुंबईकडे कूच केले आहे. लाखो मराठे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला शुभेच्छा दिल्या आहेत. परंतू जरांगे यांना सरकारने आश्वासन दिले आहे. मराठ्यांना आज ना उद्या आरक्षण मिळणारच आहे. त्यांनी याच तारखेला झालं पाहीजे त्याच तारखेला झाले पाहीजे असा आग्रह धरु नये. सरकारला निर्णय घ्यायला वेळ लागतो. जर सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास कठीबद्ध आहे असं वारंवार सांगत आहे तर मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाचा फेरविचार करावा असेही बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.

कुणबी नोंदी सापडले त्यांना प्रमाणपत्र देण्यात कुठली हरकत नाही. मात्र प्रमाणपत्र देण्याकरिता राज्य सरकारला जी प्रक्रिया पूर्ण करावी लागते ती प्रक्रिया सरकार पूर्ण करत आहे. सरकारने राजपत्र निर्गमित करून आधी दोनच कागदपत्र ग्राह्य धरली जात होती, त्यात आता वाढ केली आहे. 11- 12 प्रकारचे दस्तावेज ग्राह्य धरण्याचे ठरवले. ते कागदपत्र ग्राह्य धरण्यासाठी राजपत्र काढावे लागते. अधिकाऱ्यांना अधिकृतरित्या राजपत्र मिळत नाहीत. तोपर्यंत ते कागदपत्र ग्राह्य धरू शकत नाहीत. मात्र आंदोलनकर्त्यांची तात्काळ गावातल्या गावात कागदपत्र द्यावीत अशी मागणी आहे. हे होऊ शकत नाही याचा आंदोलनकर्त्यांनी अभ्यास करायला पाहिजे असे बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको

आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे, मात्र ते ओबीसीतून देऊ नये. ओबीसीतून सरसकट प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. शंका कुशंका निर्माण करणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसऱ्यांवर शंका निर्माण करणे, भावनिक होणे, याचा सरकारला काही फरक पडत नाही. हे आम्ही आतापर्यंत पाहिलेले आहे. सरकार वेगवेगळे आंदोलन हॅण्डल करीत असतात. त्यामुळे आपण भावनिक होऊन समाजाला भावनिक करणे यातून काहीही निष्पन्न होत नाही असेही तायवाडे यांनी म्हटले आहे.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...