AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir | अयोध्येत अनोख्या बाईकवाल्या बाबाची धूम, बाईक नव्हे हा सनातन रथ असल्याचा दावा

अयोध्येत येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अयोध्येत भक्तांसोबत साधू संत मंडळीही दाखल झाली आहेत. यात इंदूरवरून आलेल्या एका बाईकवाल्या बाबांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या बाईकवाल्या बाबांना पाहाण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी होत आहे.

Ram Mandir | अयोध्येत अनोख्या बाईकवाल्या बाबाची धूम, बाईक नव्हे हा सनातन रथ असल्याचा दावा
bawandar babaImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 19, 2024 | 10:00 PM
Share

अयोध्या | 19 जानेवारी 2024 : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सोहळ्यासाठी देशभरातीस साधु संतांची मांदियाळी येथे जमली आहे. यातच मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून आलेल्या एका अनोख्या साधूबाबांची येथे खूपच चर्चा सुरु आहे. हे साधूबाबा चक्क बजाज एवेंजर बाईकवरुन येथे दाखल झाले आहेत. हे बाबा आपल्या बाईकला सनातनचा रथ म्हणत आहे. या बवंडर बाबानी आधुनिक आपल्या बाईकला मोबाईल स्टॅंड लावला आहे. हातांना एल्बो प्रोटेक्टर आणि गुडघ्याला नी-गार्ड आणि डोक्याला हेल्मेट लावून हे बाबा बाईकवरुन अयोध्येत बाईकचे एक्सलेटर फिरवित धुर उडवित फिरत आहेत.

अयोध्येत राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेची लगबग सुरु आहे. देशभरातून येथे साधू आणि संत देखील पोहचले आहेत. त्यातच बजाज बाईकवरुन आलेल्या एका बवंडर बाबाच्या आगमनाने येथील रामभक्त आश्चर्यचकीत झाले आहेत. या अनोख्या बाईकवाल्या बाबासोबत लोक सेल्फी घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. बाबा देखील कोणलाही निराश न करता सर्वांना सवडीने फोटो घेऊ देत आहेत. बाबांच्या भगव्या रंगाच्या बाईकला पुढे रुद्राक्षांची माळ टांगलेली आहे. फ्रंट व्हीलजवळ राम ध्वज झळकत आहे. हे बाबा आपल्या बजाज एवेंजर बाईकवरून रपेट मारीत प्रवास करीत आहेत. हजारो किमीचा प्रवास करून आपण येथे आलो आणि रामललाची मूर्ती पाहून भावूक झाल्याचे ते म्हणतात.

सनातन धर्माबाबत जागरुकता

बवंडर बाबा सनातन धर्माबाबत लोकांना जागरुक करीत आहेत. यासाठी ते बाईकवरुन प्रवास करीत आहेत. माचिस, अगरबत्ती आणि रैपरवर हिंदू देवदेवतांचे छायाचित्रे छापू नका असा संदेश ते देत आहेत. या प्रकरणात आता सहा मुख्यमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळा दु.12.15 वाजल्यापासून

अयोध्येच्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी होणार आहे. राम मंदिरातील गर्भगृहात मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत दुपारी 12.15 ते 12.45 दरम्यान हा सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देशभरातील सुमारे 7 हजाराहून अधिक भक्त उपस्थित राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.