AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : पक्ष प्रमुखांचा रोष अन् शिंदे शिवसेनेतील ज्येष्ठांचे भेटीला, मुख्यमंत्र्यांचे पुढचे धोरण काय?

जिथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आमदार, खासदार यांना भेटत नव्हते असा आरोप केला जात आहे तिथे एकनाथ शिंदे यांनी भेटी-गाठीचा धडाका सुरु केला आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते अॅक्शनमोडमध्ये असून मुख्यमंत्री पदाचा कारभार संभाळत असताना संघनात्मक वाढीवरही त्यांनी भर दिला आहे. शिवाय दुसरीकडे कुणावरही टिका न करता जनतेची कामे हेच आपले ध्येय असल्याचेही ते सांगत आहे.

Eknath Shinde : पक्ष प्रमुखांचा रोष अन् शिंदे शिवसेनेतील ज्येष्ठांचे भेटीला, मुख्यमंत्र्यांचे पुढचे धोरण काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| Updated on: Jul 28, 2022 | 12:58 PM
Share

मुंबई :  (CM Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी (Shiv Sena) शिवसेनेतील आमदारांना घेऊन स्वतंत्र गटाची स्थापना केल्यानंतरही पक्ष प्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी संयमाची भूमिका घेतली होती. पण शिंदे गटात होत असलेले आऊटगोइंग पाहून सामनाच्या मुलाखती दरम्यान, ठाकरे यांनी त्यांच्यावर सडकून टिका केली आहे. यामधून त्यांचा रोष सबंध राज्यासमोर आला आहे. असे असतानाही एकनाथ शिंदे यांच्याकडून मात्र हीच खरी शिवसेना असे ठणकावून सांगितले तर जात आहेच पण आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचे इनकमिंग सुरु असताना ते आता ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी भेटीगाठीवर भर देत आहेत. त्यामुळे एकीकडे संघटन तर मजबूत होत आहेच पण दुसरीकडे प्रत्यक्ष भेटीगाठीतून आपणच म्हणजेच शिवसेना हे देखील पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. उद्योगपती रतन टाटा यांच्या भेटीनंतर शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची भेट घेतली आहे.

भेटी-गाठीचे अनेक अर्थ

जिथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आमदार, खासदार यांना भेटत नव्हते असा आरोप केला जात आहे तिथे एकनाथ शिंदे यांनी भेटी-गाठीचा धडाका सुरु केला आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते अॅक्शनमोडमध्ये असून मुख्यमंत्री पदाचा कारभार संभाळत असताना संघनात्मक वाढीवरही त्यांनी भर दिला आहे. शिवाय दुसरीकडे कुणावरही टिका न करता जनतेची कामे हेच आपले ध्येय असल्याचेही ते सांगत आहे. मुख्यमंत्री पादाची शपथ घेण्यापूर्वी केवळ आमदरांचा समावेश त्यांच्या गटामध्ये झाला होता. आता खासदार, नगरसेवक एवढेच नाहीतर पदाधिकारी देखील त्यांच्याकडे जात आहेत. यातच त्यांनी आता ज्येष्ठांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात केल्याने वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

म्हणून ज्येष्ठांचे आशीर्वाद महत्वाचे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची भेट घेतली तर सायंकाळी ते मनोहर जोशी यांच्या भेटीला जात आहेत. या ज्येष्ठ नेत्यांचे पक्ष उभारणीसाठी मोठे योगदान असल्याचे ते सांगत आहेत. त्यांच्या योगदानाबरोबरच ज्येष्ठ नेत्यांच्या कर्तुत्वाची जाण ठेवणारे शिंदे अशी एक छाप आपोआपच निर्माण होत आहे. त्यामुळे संघटन आणि खरी शिवसेना आपलीच हेच सांगण्याचा प्रयत्न आता शिंदे हे प्रत्येक कृतीमधून दाखवून देऊ लागली आहेत. अद्याप यावर कोर्टात निर्णय होईल पण त्यांचा आत्मविश्वास आणि राजकीय खेळीतील प्रत्येक पाऊल हे काही वेगळाच संदेश देणारे आहे.

उद्योगपतीनंतर आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली होती. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करुन ते गुरुवारी सकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या भेटीला गेले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खलावलेली असते त्यामुळे आपण विचारपूस करण्यासाठी गेल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत तर सायंकाळी ते मनोह जोशी यांच्या भेटीला जात आहेत. त्यांच्या या भेटीगाठीमुळे शिवसेनेतील नेत्यांना आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना नेमके काय वाटत असेल हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.