प्रवीण दरेकरांमुळे पुन्हा चर्चेत आलेलं मुंबै बँक घोटाळा प्रकरण काय आहे?, काय आहेत दरेकरांवर आरोप; वाचा स्पेशल रिपोर्ट

भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यामागे पुन्हा एकदा मुंबै बँक घोटाळ्याचा ससेमिरा लागला आहे. (what is mumbai bank scam? what allegations against pravin darekar?)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:09 PM, 2 Mar 2021
प्रवीण दरेकरांमुळे पुन्हा चर्चेत आलेलं मुंबै बँक घोटाळा प्रकरण काय आहे?, काय आहेत दरेकरांवर आरोप; वाचा स्पेशल रिपोर्ट
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

मुंबई: भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यामागे पुन्हा एकदा मुंबै बँक घोटाळ्याचा ससेमिरा लागला आहे. या प्रकरणाची आता खोलात जाऊन चौकशी होणार आहे. त्यामुळे दरेकर यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबै बँक घोटाळा नक्की काय आहे? दरेकरांवर या प्रकरणात काय आरोप आहेत? याचा घेतलेला हा सविस्तर आढावा. (what is mumbai bank scam? what allegations against pravin darekar?)

आज मुंबै बँकेचं प्रकरण चर्चेत का?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबै बँकेचं प्रकरण पुन्हा बाहेर आल्याने प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सहकार विभागाने मुंबै बँकेतील विविध शाखांचे सविस्तर लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक माहितीनुसार, नाबार्डने यासंदर्भात दिलेल्या अहवालानंतर सहकार विभागाने सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 16 फेब्रुवारीला हा अहवाल सुपूर्द करण्यात आला होता. यामध्ये मुंबै बँकेच्या विविध शाखांमध्ये भाडे करार, आधुनिकीकरण, संगणकीकरण आणि फर्निचर खरेदीच्या व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता या सर्व शाखांचे ऑडिट होईल. त्यामधून आता काय समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे घोटाळा

मुंबै बँकेच्या मुंबईतील ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर आणि अंधेरी पूर्व येथील शाखांमध्ये बनावट कर्ज घेतल्याची माहिती उघड झाली आहे. हे कर्ज वाटप करताना कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. प्रवीण दरेकर हे त्यावेळी मुंबै बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. बँकेच्या काही सदस्यांनी नाबार्डकडे या कर्ज वाटप प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी करण्यात आली असता केवळ कांदिवली पूर्व आणि अशोक वनमधील शाखांमधूनच 55 बोगस कर्जप्रकरणे उघडकीस आली होती.

गुन्हे दाखल

प्रवीण दरेकर हे मुंबै बँकेचे 2000 पासून संचालक होते. 2010 पासून अध्यक्ष आहेत. या घोटाळ्याप्रकरणी 2015मध्ये विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर. शिवाजी नलावडे आणि राजा नलावडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. 1998 पासून 123 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दरेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

नाबार्डचा अहवाल काय सांगतो?

याप्रकरणी नाबार्डने 16 फेब्रुवारी रोजी एक सविस्तर चौकशी अहवाल सादर केला आहे. नाबार्डच्या 2018-19 च्या अहवालात बँकेच्या कामकाजावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या अहवालानुसार, मुंबै बँकेच्या विविध शाखांमध्ये भाडे करार, आधुनिकीकरण, संगणकीकरण आणि फर्निचर खरेदीच्या व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या सर्व शाखांचं ऑडिट केलं जाणार आहे. (what is mumbai bank scam? what allegations against pravin darekar?)

याचं ऑडिट होणार

>> बँकेने गेल्या पाच वर्षात मालमत्ता दुरुस्ती आणि नुतनीकरणासाठी केलेल्या खर्चाची तपासणी

>> कार्पोरेट लोन पॉलिसीनुसार दिलेल्या आणि वसूल न केलेल्या थकीत कर्ज खात्यांची तपासणी

>> गृहनिर्माण संस्थाना दिलेल्या कर्जाची तपासणी

>> सभासद सहकारी संस्थांना दिलेल्या कर्ज खात्यांची तपासणी (what is mumbai bank scam? what allegations against pravin darekar?)

 

संबंधित बातम्या:

आम्ही चौकशीला घाबरत नाही, प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान

मोठी बातमी: प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात ऑडिट होणार

VIDEO | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पत्रकार परिषद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचा हसत-हसत काढता पाय

(what is mumbai bank scam? what allegations against pravin darekar?)