Rajasthan Political Crisis | राजस्थानचा सत्तासंघर्ष – केवळ 11 मुद्द्यांमध्ये सर्व राजकारण

राजस्थानातील नेमका सत्तासंघर्ष काय आहे, केवळ 11 मुद्द्यात समजून घ्या राजस्थानचं संपूर्ण राजकारण -  (what is Rajasthan Political crisis)

Rajasthan Political Crisis | राजस्थानचा सत्तासंघर्ष - केवळ 11 मुद्द्यांमध्ये सर्व राजकारण
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 2:44 PM

मुंबई : राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट हे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकार अल्पमतात येईल की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राजस्थानातील नेमका सत्तासंघर्ष काय आहे, केवळ 11 मुद्द्यात समजून घ्या राजस्थानचं संपूर्ण राजकारण –  (Rajasthan Politics)

1. विधानसभेच्या निवडणुकीपासूनच अनुभवी नेतृत्व अशोक गहलोत विरुद्ध तरुण नेतृत्व सचिन पायलट यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष रंगतोय.

2. दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गहलोत यांच्या अनुभवाला पसंती दिली. त्यामुळे  सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं

3. मध्य प्रदेशातील ऑपरेशन लोटसनंतर भाजप राजस्थानमध्येही तसं करणार असल्याच्या चर्चा सतत सुरु असतात. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे सचिन पायलटही कमळ हाती घेतील अशी चर्चाही सतत होत असते.

4. काही दिवसांपूर्वी भाजपनं काँग्रेसच्या काही आमदारांना फोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप काँग्रेसने केले.

5. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांच्याकडेच असलेल्या गृहखात्याच्या माध्यमातून पोलिसांच्या एटीएसला चौकशीचे आदेश दिले.

6. एटीएसने चौकशीची नोटीस उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनाही बजावली. त्यातच पायलट यांचं राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षही काढण्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यामुळे पायलट यांच्या संतापाचा स्फोट झाला. त्यांनी थेट दिल्ली गाठत बंडाचा झेंडा उभारला.

7.  राजस्थान विधानसभेच्या 200 जागंपैकी काँग्रेसकडे सध्या अपक्षांसह 123 आमदारांचं समर्थन आहे. जर सचिन पायलट यांच्या दाव्याप्रमाणे त्यांच्या समर्थक 24 आमदारांनी राजीनामा दिला तर विधानसभेत 176 आमदार उरतील. बहुमताचा आकडा 101 वरून 89 वर घसरेल. काँग्रेसचं संख्याबळ 83 वर येईल.

8. सचिन पायलट समर्थकांनी राजीनामा दिला तरी जर अपक्ष आणि इतर छोटे पक्ष सोबत राहिले तर काँग्रेसचं संख्याबळ हे बहुमताच्या 89  पेक्षा जास्त असल्यानं सरकार वाचेल.

9. सचिन पायलट समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर जर बदलते वारे पाहून अपक्ष, छोट्या पक्षांचे आमदार भाजपकडे वळले तर मात्र भाजपचं संख्याबळ बहुमत गाठू शकतं. काँग्रेसची सत्ता जाऊन राजस्थानातही कमळ फुलू शकतं, पण सध्याचं संख्याबळ पाहता, भाजपसाठी ते सोपं नाही.

10. सध्या तरी दिल्लीत सचिन पायलट यांच्यासोबत काँग्रेस आणि समर्थक अपक्ष असे 15 आमदार असल्याचं कळतंय. केवळ त्यांनी राजीनामा दिला तर बहुमत 93 वर असेल. त्या परिस्थितीत सरकार धोक्यात येईल मात्र, अपक्ष, छोटे पक्ष साथ सोडतीलच असं नाही. मग, सत्तेचा घोडाबाजार रंगेल.

11. अर्थात असं जरी असलं तरी सचिन पायलट सर्व काही पक्कं ठरल्याशिवाय काँग्रेस सोडणार नाहीत. कारण भाजपमध्ये गेल्यावर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेलच असं नाही. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे आजही त्यापदाच्या प्रबळ दावेदार आहेत. कदाचित ते वेगळ्या पक्षाचा स्वतंत्र पर्याय स्वीकारतील अशीही चर्चा आहे. कदाचित व्यवस्थित जमत नसेल तर ते सध्या संयमाची भूमिकाही स्वीकारुन आणखी योग्य वेळेची वाटही पाहू शकतात.

(Rajasthan Politics)

संबंधित बातम्या 

Rajasthan Political Crisis LIVE | काँग्रेसच्या बैठकीला 107 आमदार, गहलोत सरकार भक्कम   

Rajasthan crisis | राजस्थानमध्ये संकट, तात्काळ पोहोचा, महाराष्ट्रातील खास मोहऱ्याला राहुल गांधींचा निरोप   

Sachin Pilot | 26 व्या वर्षी खासदार ते केंद्रीय मंत्री, गहलोत सरकारला हादरे देणारे सचिन पायलट कोण आहेत? 

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.