Rajasthan crisis | राजस्थानमध्ये संकट, तात्काळ पोहोचा, महाराष्ट्रातील खास मोहऱ्याला राहुल गांधींचा निरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या विश्वासातील महाराष्ट्राचा मोहरा राजस्थानकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. Rahul Gandhis message to Rajiv Satav

Rajasthan crisis | राजस्थानमध्ये संकट, तात्काळ पोहोचा, महाराष्ट्रातील खास मोहऱ्याला राहुल गांधींचा निरोप

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये काँग्रेस सरकावर अस्थिरतेचे ढग असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या विश्वासातील महाराष्ट्राचा मोहरा राजस्थानकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना तात्काळ राजस्थानला रवाना होण्याचे आदेश राहुल गांधी यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या राजीव सातव हिंगोलीत आहेत. (Rahul Gandhis message to Rajiv Satav Rajasthan crisis)

 TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना निरोप पाठवला असून, ते आज संध्याकाळीच राजस्थानला रवाना होणार आहेत. राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. राजीव सातव यांनी गुजरातमध्ये पक्षबांधणीत मोठं काम केलं होतं. त्याचंच फळ म्हणून काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. (Rahul Gandhis message to Rajiv Satav Rajasthan crisis)

काँग्रेस विधीमंडळ बैठक

राजस्थानातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधीमंडळ बैठक होत आहे. या बैठकीला अपक्ष दहा आमदारांसह काँग्रेसचे 90 आमदार उपस्थित आहेत. सर्व आमदारांना या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसने व्हिप जारी केला आहे. मात्र सचिन पायलट या बैठकीला हजर नाहीत. त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

राजस्थानमध्ये राजकीय संकट

मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकार डळमळीत (Rajasthan Political Crisis) करण्याचे राजकारण सध्या राजस्थानमध्ये सुरु आहे. उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या बंडाने तसंच त्यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीगाठीने, काँग्रेसच्या सत्तेवरील ढग काळवंडले आहेत. सचिन पायलट यांनी कालच सध्याचे भाजप नेते आणि त्यांचे काँग्रेसमधील जुने मित्र असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये आज काँग्रेस विधीमंडळाची बैठक होत आहे. त्याआधी रात्री अडीच वाजता काँग्रेसच्या दिल्लीवरुन आलेल्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत, सरकार स्थिर असल्याची माहिती दिली होती.

(Rahul Gandhis message to Rajiv Satav Rajasthan crisis)

संबंधित बातम्या 

Rajasthan Political Crisis LIVE | पायलट समर्थक चार आमदार गहलोतांच्या बैठकीला   

Rajasthan Crisis: मुख्यमंत्री गहलोत समर्थक आमदारांवर आयकर छापे, दिल्ली ते राजस्थानपर्यंत धाडी 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *