मंगेशकर असोत की तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, राष्ट्रवादी आक्रमक

सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! 'भारतरत्नांनी' पदाला साजेसं असंच बोलावं वागावं, असं अमोल मिटकरी म्हणाले.

मंगेशकर असोत की तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, राष्ट्रवादी आक्रमक
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अमोल मिटकरी
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 11:40 AM

मुंबई : शेतकरी आंदोलनावरुन (Farmers Protest) सुरु झालेलं सोशल वॉर थांबायचं नाव घेताना दिसत नाही. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची (Celebrities tweet) चौकशी करण्याचा इशारा दिल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)  यांनी उत्तर दिलं आहे. (Whether Mangeshkar or Tendulkar, celebrity tweets must be investigated, NCP in action mode Farmers Protest)

“सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! ‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं. फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचून घ्यावा”, असा हल्लाबोल अमोल मिटकरी यांनी केला. ट्विटरवर त्यांनी हे भाष्य केलं.

अमोल मिटकरी यांचं ट्विट

अनिल देशमुख काय म्हणाले?

पॉप सिंगर रिहानाने (Pop singer Rihanna ) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर, त्यावर प्रतिक्रिया देतांना अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. परदेशी व्यक्तींनी बोलू नये, भारत एक आहे, देशातील प्रश्न आमचे आम्ही सोडवू अशा आषयाचे ट्विट लता मंगेशकर, सचिन तेंडुलकरसह दिग्गज सेलिब्रिटींनी केले होते. मात्र शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र

राज्य सरकारचा सेलिब्रेटीच्या ट्विट करण्या निर्णय हा संतापजनक असून कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? अशा प्रश्नांची सरबत्ती देवेंद्र फडणवीस यांनी केली. भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत, निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला. भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, असा संताप देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

(Whether Mangeshkar or Tendulkar, celebrity tweets must be investigated, NCP in action mode Farmers Protest)

संबंधित बातम्या 

लतादीदी, तेंडुलकर, सुनील शेट्टीची चौकशी नको, आधी ‘त्या’ सेलिब्रिटींना धरा, राम कदमांचं गृहमंत्र्यांना पत्र   

लता मंगशेकर, सचिन तेंडुलकर, सायनाच्या ट्विटची चौकशी होणार; देशमुखांकडून सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीचे आदेश

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.