Eknath Shinde : आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण आणि पर्यटन खाते नव्या मंत्रिमंडळात कुणाकडे?

पर्यावरणाचे संवर्धन करण्याकडे आदित्य ठाकरे यांचा कल असल्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे हे खाते होते. शिवाय अनेक ठिकाणी त्यांनाी भेटी देऊन पर्यावरण संवर्धानाबाबत पाऊलही उचलले होते. आमदार ते थेट कॅबिनेट मंत्री त्यांच्या हा प्रवासावरुन ते टीकेची धनही ठरले होते. त्यांच्या कार्यकाळात मुद्दा गाजला तो आरे कारशेडचा.

Eknath Shinde : आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण आणि पर्यटन खाते नव्या मंत्रिमंडळात कुणाकडे?
आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे
राजेंद्र खराडे

|

Aug 14, 2022 | 8:44 PM

मुंबई : शिंदे सरकारच्या (Cabinet Expansion) मंत्रिमडळाचा विस्तारही झाला अन् आता खातेवाटपही पार पडले आहे. 15 ऑगस्टपूर्वीच खातेवाटप केले जाणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. असे असले तरी, महाविकास आघाडी सरकारच्या काळात (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेले पर्यावरण आणि पर्यटन खाते कुणाकडे जाणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, ज्या खात्यामध्ये आदित्य ठाकरे यांना रुची होती ते खाते (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडे ठेवले आहे. हे खाते एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडे ठेऊन शिवसेनेला हिनवण्याचा प्रयत्न केला की, या खाताच्या माध्यमातून अधिक कामे करण्याचा उद्देश त्यांचा राहणार हे तर आता आगामी काळातच पहावे लागणार आहे. शिवाय आरे कारशेडवरुन सातत्याने राजकारण होत असून मेट्रोसारखा उपक्रम मार्गी लावण्यासाठीही हे खाते मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवले असल्याची चर्चा आहे. तर दुसरे पर्यटन हे खाते देखील मुंबईतच राहणार आहे. भाजपाचे आ. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे या खात्याचा पदभार असणार.

आदित्य ठाकरेंच्या खात्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे

पर्यावरणाचे संवर्धन करण्याकडे आदित्य ठाकरे यांचा कल असल्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे हे खाते होते. शिवाय अनेक ठिकाणी त्यांनाी भेटी देऊन पर्यावरण संवर्धानाबाबत पाऊलही उचलले होते. आमदार ते थेट कॅबिनेट मंत्री त्यांच्या हा प्रवासावरुन ते टीकेची धनही ठरले होते. त्यांच्या कार्यकाळात मुद्दा गाजला तो आरे कारशेडचा. युती सरकारच्या काळात ज्या मार्गावरुन मेट्रो धावणार त्याला देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला होता. पण यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते म्हणून त्याला महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा आरे कारशेड येथून मेट्रो मार्ग होणार असा निर्णय शिंदे सरकारने घेतला. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.

आरे वरुन झाले होते कारे..!

शिंदे सरकारने आरे कारशेडहून मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय महाविकास आघाडी काळात घेतलेले निर्णयही मोडीत काढले आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर मात्र, पर्यावरण प्रेमींनी याठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आदित्य ठाकरे यांनीही पर्यावरण प्रेमीच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत सरकारच्या निर्णयाला विरोध केला. पण आता हे खातेच मुख्यमंत्री यांच्याकडे असल्याने याबाबत ते काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

पर्यटन मंत्रीपदी मंगलप्रभात लोढा

महाविकास आघाडी सरकराच्या काळात पर्यावरण बरोबर पर्यटन खाते देखील आदित्य ठाकरे यांच्याकडे होते. ते खाते आता भाजपाचे मुंबईतील आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आले आहे. यापूर्वीच मंत्रिमंडळात मुंबईतील एकही मराठी माणूस मिळाला नाही का म्हणत शिवसेनेने सरकारवर टीका केली होती. असे असतानाच हे खाते भाजपाचे लोढा यांच्याकडे देण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें