केबल ऑपरेटर ते कॅबिनेट मंत्री! कोण आहेत अनिल परब ज्यांच्यावर ईडीनं कारवाई केली?

केबल ऑपरेटर ते कॅबिनेट मंत्री! कोण आहेत अनिल परब ज्यांच्यावर ईडीनं कारवाई केली?
कोण आहेत अनिल परब?
Image Credit source: TV9 Marathi

Anil Parab : अनिल परब नेमके कोण (Who is Anil Parab) आहेत? शिवसेनेतलं त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे? केबल ऑपरेट असणारे अनिल परब कॅबिनेट मंत्री कसे झाले? हे जाणून घेऊयात..

सिद्धेश सावंत

|

May 26, 2022 | 2:03 PM

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनिल परबांवर (Anil Parab ED Raids) कारवाई करण्यात आली आहे. परिवहन मंत्री असलेल्या अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी धडकले. त्यासोबत त्यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. याप्रकरणी सध्या त्यांची चौकशी (Anil Parab inquiry) केली जातेय. मुंबई, पुण्यासह रत्नागिरीतही अनिल परबांशी संबंधित मालमत्ता आणि ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. या संपूर्ण ईडी कारवाईनं अनिल परब चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या हे अनिल परबांवर गंभीर आरोप करत होते. अनिल परबांच्या दापोलीतल्या रिसॉर्टवरुन किरीट सोमय्यांनी आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनिल परब नेमके कोण (Who is Anil Parab) आहेत? शिवसेनेतलं त्यांचं स्थान किती महत्त्वाचं आहे? केबल ऑपरेट असणारे अनिल परब कॅबिनेट मंत्री कसे झाले? हे जाणून घेऊयात..

हे सुद्धा वाचा

कोण आहेत अनिल परब?

 1. शिवसेनेची कायद्याची बाजू सांभाळणारे म्हणून अनिल परब यांच्याकडे पाहिलं जातं. अनिल परब हे वकील असून त्यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून कामंही केलंय.
 2. अनिल परबांचं पूर्ण नाव अनिल दत्तात्रय परब आहे. तर त्यांच्या आईचं नाव विजया परब आहे.
 3. बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनिल परबांनी वकिलीचं शिक्षण घेतलं. 1985 मध्ये त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं.
 4. मराठी हिंदीसह इंग्रजी भाषेवर अनिल परब यांचं प्रभुत्व आहे.
 5. सार्वजनिक उपक्रमांचं आयोजन, रक्तदान शिबिरं, कायद्याविषयक मोफत सल्ला देणं, यातून सगळ्यातून अनिल परब राजकारणात सक्रिय झाले.
 6. विद्यार्थी सेनेच्या आंदोलातही अनिल परब सक्रिय होते.
 7. अनिल परबांच्या नेतृत्त्वात विद्यार्थी सेनेची अनेक आंदोलनं झाली होती.
 8. अनिल परब हे केबल व्यावसायीक असून त्यांच्याकडे नंतरच्या काळात शिवसेना प्रणित केबल संघटनेचं अध्यक्षपदही देण्यात आलेलं होतं.
 9. 2001 साली शिवसेनेचे विभागप्रमुख म्हणून अनिल परब यांची नियुक्ती करण्यात आली.
 10. विभागप्रमुख झाल्यानंतर खऱ्याअर्थानं अनिल परबांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
 11. 2001 ते 2004 पर्यंत पक्षात वेगवेगळ्या भूमिका अनिल परब यांच्याकडे शिवसेनेकडून देण्यात आल्या होत्या.
 12. 2004 साली विधान परिषदेवर अनिल परब यांना पाठवण्यात आलं होतं.
 13. 2004 पासून अनिल परब सलग विधानपरिषदेवर होते.
 14. महाराष्ट्र विधान परिषदेचे उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानंही अनिल परबांचा गौरव करण्यात आलेलाय.
 15. 2015 साली खर्या अर्थानं अनिल परब प्रकाशझोतात आले.
 16. बाळा सावंत यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत यांना उमेदवारी वांद्रेतून देण्यात आली होती. त्यावेळी अनिल परबांकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला होता. या मोलाची भूमिका अनिल परबांनी वठवली होती.
 17. 2015 नंतर शिवसेनेत अनेक नवनव्या जबाबदाऱ्या अनिल परबांकडे देण्यात आल्या.
 18. 2017 साली मुंबई महापालिका निवडणुकीत मोलाची भूमिका अनिल परबांनी पार पाडली होती
 19. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला. पण कायद्याच्या भाषेत अनिल परबांकडून उत्तर देण्यात आलेलं होतं. दरम्यान, 2017 साली महापालिकेत शिवसेनेचा मुंबई पालिकेवर दणदणीत विजय झालेला. त्यामुळे अनिल परबांचं काम पुन्हा समोर आलं होतं.
 20. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन वाद गाजला. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल परबांच्या कामाची दखल घेत त्यांच्याकडे मंत्रीपद देण्यात आलं.
 21. परिवहन मंत्री म्हणून अनिल परबांची नियुक्ती करण्यात आली. तसंच संसदीय कार्यमंत्री म्हणूनही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. शिवाय रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे देण्यात आलं.
 22. अनिल परबांना मंत्री बनवल्यानं शिवसेनेत दोन गट पडल्याचंही दिसून आलं होतं. तरिही उद्धव ठाकरे परबांच्या नेमणुकीवर ठाम होते.
  आरे, कांजूर मेट्रो कारशेड, सचिन वाझे प्रकरण, मराठा आरक्षण यावरुन शिवसेनेवर अनेक आरोप झाले होते. पण अनिल परबांनी नेहमीच कायद्याचे जाणकार असल्याचं दाखवून देत विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिली होती.
 23. शिवसेनेचे संकट मोचक आणि उद्धव ठाकरेंचं विश्वासू म्हणून अनिल परब यांच्याकडे शिवसेनेत पाहिलं जातं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें