वडिलांबरोबर अयोध्येत कारसेवा, सव्वाशेपेक्षा अधिक आंदोलने; जाणून घ्या संघर्षशील नेत्या मनिषा कायंदेंबद्दल!

अनेक महिला आज राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यातील काही महिला राजकारण्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे. (who is manisha kayande?, know details about her political Career)

वडिलांबरोबर अयोध्येत कारसेवा, सव्वाशेपेक्षा अधिक आंदोलने; जाणून घ्या संघर्षशील नेत्या मनिषा कायंदेंबद्दल!
Manisha Kayande
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 5:20 PM

मुंबई: अनेक महिला आज राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यातील काही महिला राजकारण्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार डॉ. मनिषा कायंदे या त्यापैकीच एक. बालवयातच संघाचे संस्कार झालेल्या कायंदे या आज शिवसेनेत कार्यरत आहे. केवळ महिलांच्याच प्रश्नांवर नाही तर राज्यातील प्रत्येक प्रश्नांवर त्या बोलत असतात. पीडितांना हक्क मिळवून देण्यासाठी त्या संघर्ष करत असतात. कायंदे यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. (who is manisha kayande?, know details about her political Career)

कौटुंबीक स्थिती

मनिषा कायंदे या विधान परिषेदेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्यामसुंदर कायंदे आणि सुशीला कायंदे यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम पाहिलं आहे.

मोलाचं संशोधन

मनिषा कायंदे यांनी वटवाघूळाच्या प्रजनन ग्रंथीबाबत संशोधन केलं होतं. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे. याशिवाय 11 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. तर त्यांनी डिस्ट्रिक्ट प्लानिंग अँड डेव्हलपमेंट कमिटीच्या सदस्या म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी महिला दक्षता समिती (मुंबई पोलीस)च्या सदस्य म्हणूनही काम केल आहे. महिलांवरील अत्याचार, महिलांना आरक्षण, महिलांच्या रेल्वे प्रवासाच्या समस्या आदी मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.

घरातूनच राजकारणाचं बाळकडू

मनिषा कायंदे यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले आहेत. त्या लहानपणी वडिलांबरोबर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकायला जात. वडिलांची ग्रामीण भागात नेत्रं शिबिरे भरायची. त्यात त्या मदत करत. त्यामुळे त्यांना ग्रामीण महाराष्ट्र जवळून पाहता आला आहे. त्यांचे वडील तीनदा कारसेवेसाठी अयोध्येला गेले होते. 1992मध्ये मनिषा कायंदेही वडिलांबरोबर अयोध्येला कारसेवासाठी गेल्या होत्या. या अर्थाने त्यांना घरातूनच समाजसेवा आणि राजकारणाचं बाळकडू मिळालेलं आहे.

गाईडचा सल्ला

कायंदे या विल्सन महाविद्यालयातून एमएससी करत होत्या. त्यावेळी डॉ. सुधाकर करमरकर त्यांना गाईड होते. तेव्हा करमरकर सर त्यांना समाजसेवेबाबत मार्गदर्शन करायचे. ‘समाजसेवा करायची असेल तर आधी शिका. स्वत:च्या पायावर उभे राहा आणि मग समाजसेवा करा. रिकाम्या खिशाने समाजसेवा करू नका’, असं करमरकर सांगायचे. त्यांनी हा सल्ला कायम लक्षात ठेवला.

संघाचे संस्कार, भाजपमधून राजकारण

लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली. अयोध्येला जाऊन आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये काम सुरू केलं. तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं. या काळात त्यांनी जयवंतीबेन मेहता, सुषमा स्वराज, राजमाता विजयाराजे शिंदे यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळाली. 1997मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला. पुढे 2009मध्ये त्यांनी सायन कोळीवाडामधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, मनसेची लाट असल्याने त्यांचा पराभव झाला. पराभव होऊनही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी विविध प्रश्नांवर सुमारे सव्वाशे आंदोलने केली.

शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंची गुगली

पुढे 2012मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014मध्ये त्यांना शिवसेनेचं प्रवक्तेपद मिळालं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमीच कार्यकर्त्यांशी दिलखुलास चर्चा करतात. कधीकधी गुगली टाकून कार्यकर्त्यांची टोपी उडवतात. एकदा त्यांनी मी तुम्हाला काही तरी वेगळे काम देणार आहे. काय काम असेल असे वाटते? असा सवाल करणारी गुगली कायंदेंना टाकली. त्यामुळे कायंदे थोड्या गोंधळून गेल्या. त्यानंतर त्यांनीच मी तुम्हाला विधान परिषदेवर पाठवणार आहे, असं सांगितलं. हे ऐकून कायंदेंना क्षणभर विश्वासच बसला नाही. परंतु, उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला. त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. विधान परिषदेवर जाणं हा आपल्यासाठी टर्निंग पॉइंट होता, असं त्या सांगतात.

फ्रेंच अॅपविरोधात आवाज उठवला

‘ग्लिडेन’ या फ्रेंच डेटिंग अॅपने एक अहवाल जाहीर केला होता. त्यात 48 टक्के महिलांचे विवाह बाह्य संबंध असल्याचं म्हटलं होतं. हा अहवाल आल्यानंतर मनिषा कायंदे यांनी त्याविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करत या अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. महिला दिनाच्या दिवशीच या अॅपने सर्व्हे जाहीर करून विकृतपणा दाखवला असल्याचं सांगत त्यांनी हा सर्व्हे खोटा असल्याचं सांगत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

स्त्रियांच्या प्रश्नांवर कार्यरत

कायंदे या स्त्रियांच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवत असतात. महिलांना न्याय मिळावा म्हणून त्या अवनी या संस्थेमार्फत स्त्री शक्ती केंद्र चालवत आहेत. महिला सर्वच क्षेत्रात असाव्यात असं त्यांना वाटतं. राज्याच्या मुख्यसचिवपदी महिला असावी, मुंबई पोलीस आयुक्तपदीही महिला असावी असं त्यांना वाटतं. महापालिकेत महिलांना आरक्षण आहे. मग विधानसभा आणि लोकसभेला का नाही? असा सवालही त्या करतात. राजकीय आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, आता राजकीय पक्षांनीच महिलांना अधिकाधिक संधी द्यायला हवी, असा उपायही त्या सांगतात. (who is manisha kayande?, know details about her political Career)

संबंधित बातम्या:

वडिलांचं निधनामुळे मायदेशी यावं लागलं आणि राजकारणात एन्ट्री झाली; वाचा जयंत पाटलांची ‘राज’नीती!

बालपणी बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवला, आता पवारांचे आशीर्वाद; आमदार लंकेंची चर्चा तर होणारच!

राजीव गांधींचा मध्यरात्री फोन आला अन् राजकारणात आलो; पृथ्वीबाबांचा हा किस्सा माहीत हवाच!

(who is manisha kayande?, know details about her political Career)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.