आधी काँग्रेस, नंतर मोदी विरोधात बंड; अशी आहे नाना पटोलेंची राजकीय कारकिर्द!

नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुक्तीच नियुक्ती झाली आहे. (who is Nana Patole? know everything about him)

आधी काँग्रेस, नंतर मोदी विरोधात बंड; अशी आहे नाना पटोलेंची राजकीय कारकिर्द!
nana patole

मुंबई: नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुक्तीच नियुक्ती झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधी काँग्रेसविरोधात बंड केल्यानंतर नंतर नाना पटोले भाजपमध्ये आले. पण तिथेही शेतकऱ्यांच्याच प्रश्नावरून बंड करून ते बाहेर पडले. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणारे पटोले हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. वादळी राजकीय कारकिर्द असलेल्या नाना पटोले यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा. (who is Nana Patole? know everything about him)

नानांची कौटुंबीक पार्श्वभूमी

नाना पटोले यांचे पूर्ण नाव नानाभाऊ फाल्गुनराव पटोले असं आहे. ते 58 वर्षाचे असून भंडारा येथे त्यांचा जन्म झाला आहे. पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा त्यांचा परिवार असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. 1990मध्ये नाना पटोले हे भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य बनले. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं. पण काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मात्र, या पहिल्या निवडणुकीत त्यांना अपयशाला सामोरे जावं लागलं. भाजपच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी 1999 आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

प्रफुल्ल पटेलांचा पराभव

पटोले यांनी काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं होतं. 2014मध्ये भाजपचे खासदार बनल्यानंतर ते पहिल्यांदा चर्चेत आले. 2014मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाहोता. भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर ते खासदारही झाले. 2014च्या निवडणुकीत त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. त्यांनी पटेल यांचा 1,49,254 मतांच्या अंतराने पराभव केला होता.

चार वर्षातच स्वगृही

अवघ्या चार वर्षातच म्हणजे 2018मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2018 मध्ये त्यांची शेतकरी मजदूर काँग्रेसचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी साकोली मतदारसंघातून भाजपच्या परिणय फुके यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. या हायव्होल्टेज लढतीत ते विजयी होऊन विधानसभेवर निवडून आले.

एकाच आरोपावरून पक्ष सोडले

काँग्रेस सोडताना त्यांनी काँग्रेस शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, भाजप सोडतानाही त्यांनी शेतकरी प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला होता. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे, असं सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोलेंनी हल्लाबोल चढवला होता. 2017 मध्ये नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसच्या गोटात सहभागी झाले.

आंबेडकरी जनतेचा विरोध

दरम्यान, खैरलांजी येथे भोतमांगे कुटुंबातील चौघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. त्यावेळी पटोले यांनी मारेकऱ्यांची बाजू घेतली होती. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नये म्हणून आंबेडकरी जनतेने मागणी केली होती. आंबेडकरवादी संघटनांनी याबाबत थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे मागणीही केली होती.

विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती झाली होती. दिलीप वळसे पाटलांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. त्यामुळे बहुमताच्या चाचणीवेळी वळसेंची वर्णी लागली होती. त्यानंतर नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. (who is Nana Patole? know everything about him)

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे तीन तीन पदाची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी काही नावांची चर्चा सुरू झाली होती. त्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि स्वत: पटोले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अखेर त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. (who is Nana Patole? know everything about him)

 

संबंधित बातम्या:

21व्या वर्षी साखर कारखान्याचं अध्यक्षपद, उत्कृष्ट संसदपटू; शंभूराज देसाईंविषयी हे माहीत आहे का?

स्वच्छ प्रतिमेचे, पाच वेळा आमदार; असा आहे अनिल देशमुखांचा राजकीय प्रवास!

सहकार ते राजकारण; जाणून घ्या कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील?

पँथर ते काँग्रेस… नितीन राऊतांचा सामाजिक, राजकीय संघर्ष माहीत आहे का?

(who is Nana Patole? know everything about him)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI