पँथर ते काँग्रेस… नितीन राऊतांचा सामाजिक, राजकीय संघर्ष माहीत आहे का?

वीज कापण्याच्या निर्णयावरून पुन्हा एकदा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. (dalit panther to congress, nitin raut's political journey was not easy)

पँथर ते काँग्रेस... नितीन राऊतांचा सामाजिक, राजकीय संघर्ष माहीत आहे का?
ऊर्जा मंत्री नितीन राऊत
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 9:09 PM

मुंबई: वीज कापण्याच्या निर्णयावरून पुन्हा एकदा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. वाद, टीका आणि संघर्ष हा तसा राऊत यांना नवीन नाही. महाविद्यालयीन जीवनापासून ते आजपर्यंत प्रत्येक वेळेला त्यांना संघर्ष करावा लागत आहे. पँथर कार्यकर्ता ते काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री हा त्यांचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. त्यासाठी त्यांना खूप खस्ता खाव्या लागल्यात. या संघर्षाचाच घेतलेला हा आढावा. (dalit panther to congress, nitin raut’s political journey was not easy)

कौटुंबीक पार्श्वभूमी

डॉ. नितीन काशिनाथ राऊत हे राऊत यांचं पूर्ण नाव. नागपूरमध्ये 9 ऑक्टोबर 1952मध्ये त्यांचा जन्म झाला. पती, एक मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे. स्वातंत्र्याचा लढाईत सक्रिय असलेले त्यांचे वडील मिल मजूर तर आई गृहिणी होती.

शिक्षण

नितीन राऊत यांचं प्रेरणास्त्रोत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे राऊत यांनी उच्च शिक्षण घेतलं नसतं तर नवलंच. त्यांनी बीएस्सी पूर्ण केल्यावरही ज्ञानोपासना जोपासली. आंबेडकर थॉट्समध्ये एम. ए. व नंतर पीएचडी पूर्ण केली. त्यांनी नाट्य विषयात मास्टर ऑफ फाईन आर्ट्स देखील केले. ते कमर्शियल पायलटही होते.

राजकारणास सुरुवात

राऊत यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. तरीही त्यांनी या सर्वांवर मात करत शिक्षण घेतलं. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात सामाजिक आंदोलनातून झाली. महाविद्यालयीन जीवनापासून ते विविध सामाजिक आंदोलनात सहभागी झाले. दलित पँथर चळवळीत ते सक्रिय होते. सत्तरच्या दशकात दलित पँथर चळवळीने जोर धरला होता. दलित अत्याचाराविरोधात उभ्या ठाकलेल्या या चळवळीत त्यावेळचे तरुण ओढले गेले होते. विदर्भात अनेकांनी पँथर वाढवली. राऊतही तरुण वयात या चळवळीकडे ओढले गेले. मराठवाडा नामांतर आंदोलन ते खैरलांजी आंदोलनापर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. आजही महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात दलितांवर अन्याय अत्याचार होताच राऊत त्याविरोधात आवाज उठवतात. त्यांनी ‘संकल्प’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक कार्य केले असून मागास वर्गातील जनतेला मदत करण्यासाठी ते काम करतात.

राजकीय कारकिर्द

1999, 2004 आणि 2009 मधील विधानसभा निवडणुकीत ते नागपूर उत्तर मतदारसंघातून आमदारपदी निवडून गेले होते. त्यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, गृह, जेल, राज्य कामगार आणि उत्पादन शुल्क विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद भूषवलं आहे. 2014 च्या निवडणुकीत मात्र भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांनी नितीन राऊतांचा पराभव केला. 2019 च्या निवडणुकीत ते 20 हजाराच्या मताधिक्याने निवडून आले. सध्या ते काँग्रेसच्या अखिल भारतीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष व राज्याचे कार्याध्यक्ष आहेत. काँग्रेसला विदर्भात सर्वात जास्त अनुकूल वातावरण असते. ज्यामुळे यंदाच्या निवडणुकीत फारसे प्रयत्न न करताही काँग्रेसला 15 जागा मिळाल्या.

पुस्तकांचे लिखाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर नितीन राऊत यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब नियोजनावरील विचार आणि आधुनिक भारताशी त्याचा संबंध’ यासारख्या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत. बुद्ध-आंबेडकरांच्या विचारावर त्यांनी एकूण चार पुस्तके लिहिली आहेत.

राजकीय आलेख:

>> 1999-2004, 2004-2009, 2009-2014 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा >> विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे सदस्य >> आरक्षण अधिनियमासाठी गठित केलेल्या समितीचे सदस्य >> वनोत्पादनाच्या चोरी संबंधीच्या संयुक्त समितीचे सदस्य >> विधान मंडळाच्या रोजगार स्वयंरोजगार समितीचे सदस्य >> डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2009 गृह, तुरुंग, >> राज्य उत्पादन शुल्क व कामगार खात्याचे राज्यमंत्री, >> ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड (dalit panther to congress, nitin raut’s political journey was not easy)

इतर पदे:

>> अध्यक्ष, पिपल्स प्रोग्रेसिव्ह सोसायटी, नागपूर, >> आजीव सदस्य, नागपूर फ्लाईंग क्लब लि.; >> सदस्य, डी. यु. डी. ए.; >> विश्वस्त, नागपूर सुधार प्रन्यास, >> सदस्य, गृह विभाग कामकाज स्थायी समिती; >> अध्यक्ष, राज्य परिवहन सल्लागार समिती, >> अध्यक्ष, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय सल्लागार समिती >> अध्यक्ष, अखिल भारतीय अनुसूचित जाती/जमाती शिकाऊ विमानचालक संघटना >> सल्लागार, महाराष्ट्र राज्य वनपाल व वनरक्षक संघटना व वेस्टर्न कोलफिल्डस् लि. अनुसूचित जाती/जामाती कर्मचारी कल्याण संघटना

इतर कामे

>> सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना नितीन राऊत यांनी केलेल्या प्रयत्नामुळे 2004मध्ये दलित आणि मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण मिळाले होते.

>> पददलितांच्या उद्धारासाठी संकल्प संस्था सुरु करुन या संस्थेमार्फत समाजातील दुर्बल घटकांसाठी काम >> जातीय दंगली, पूरग्रस्त आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मदत >> दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी नागपूर येथे दीक्षाभूमीला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यासाठी सक्रिय सहाय्य >> 1987 मोफत अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करुन लाखो भाविकांना अन्नदान, पिण्याच्या पाण्याची मोफत सोय, प्रसाधन गृहे, स्नानगृहे उभी केली, 2.5 लाख लोकांच्या विश्रांतीसाठी मंडपाची सोय केली; >> पर्यावरण, दारुबंदी, व्यसनमुक्ती, व्यवसायिक शिक्षण, युवकांना मार्गदर्शन >> महिला आणि बालकल्याण, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी मोफत प्रदर्शन, जनजागृती शिबिरांचे आयोजन >> 1988 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेसाठी आयोजन >> 1989 राष्ट्रीय एकात्मतेसाठी नागपूर ते रायपूर भीमज्योत यात्रेचे आयोजन >> 1991 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 100 व्या जयंतीनिमित्त नागपूर येथील कस्तूरचंद पार्क येथे भव्य रॅलीचे आयोजन >> मराठवाडा नामांतर आंदोलनात सक्रिय सहभाग >> नागपूर विद्यापीठामधील अनुसूचित जाती आणि जमाती यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न >> महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसाठीच्या आंदोलनात सहभाग >> सेवेतील सुरक्षितता व सुधारित वेतनश्रेणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न, अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायिक आणि खासगी >> विमानचालन अनुज्ञाप्ती तसेच शिष्यवृत्ती मिळावी यासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व >> 1989 चंद्रपूर येथे दलित साहित्य संमेलनात सहभाग आणि विविध विषयांवर व्याख्याने दिली >> 1991 विदर्भ साहित्य संमेलनात सहभाग; 2002 नागपूर येथे अस्मितादर्श रजत महोत्सव आणि साहित्य संमेलनाचे आयोजन >> 1990 नागपूर जिल्ह्यातील मकर-धोकडा येथील जातीय दंगलीतील दंगलग्रस्तांना मदत >> 1991 मोवाड आणि नागपूर येथील पूरग्रस्तांना मदत कार्य आणि 15दिवस अन्नदान >> स्वतंत्र विदर्भाचे समर्थक, विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्नशील >> 19 एप्रिल 2000 संविधान बचाओ रॅलीचे आयोजन, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील मागासवर्गीय अनुशेष भरण्यासाठी प्रयत्न >> भारत सरकारच्या राष्ट्रीय आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोग स्थापन्यासाठी प्रयत्न >> 1962 मधील संसद आणि राज्य विधानसभेत, अनुसूचित जातीसाठींच्या राखीव जागांच्या संख्येइतकी वाढ करण्याची राज्य शासनाची शिफारस मिळविण्यासाठी प्रयत्न (dalit panther to congress, nitin raut’s political journey was not easy)

पुरस्कार आणि सन्मान

>> मोरवाडा येथील पूरग्रस्त भागामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वनराई संस्थेमार्फत पुरस्काराने सन्मानित >> रत्नागिरी येथे आरक्षण विधेयकासाठी सन्मानित (dalit panther to congress, nitin raut’s political journey was not easy)

संबंधित बातम्या:

मूळचे शिवसैनिक, भाजपचे कट्टर विरोधक; अशी आहे विजय वडेट्टीवारांची राजकीय कारकिर्द

शिवसेनेचे ‘संकटमोचक’ आणि ठाकरेंचे विश्वासू; वाचा, अनिल परब यांचा पॉलिटिकल ग्राफ!

71 कोटींचा बँक घोटाळा; वाचा, कोण आहेत आमदार अनिल भोसले!

पाचवेळा आमदार, तरीही पक्षातच ‘उपरे’ ठरविले गेले; वाचा, प्रकाश भारसाकळेंचा संघर्ष

(dalit panther to congress, nitin raut’s political journey was not easy)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.