AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचवेळा आमदार, तरीही पक्षातच ‘उपरे’ ठरविले गेले; वाचा, प्रकाश भारसाकळेंचा संघर्ष

अकोला जिल्ह्यातल्या अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (read unknown facts about mla prakash bharsakale)

पाचवेळा आमदार, तरीही पक्षातच 'उपरे' ठरविले गेले; वाचा, प्रकाश भारसाकळेंचा संघर्ष
| Updated on: Mar 07, 2021 | 5:18 PM
Share

मुंबई: अकोला जिल्ह्यातल्या अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तिने भारसाकळेंच्या घरी पत्र पाठवून पाच कोटींची खंडणी मागितली आहे. त्यामुळे भारसाकळे चर्चेत आले आहेत. आपल्याच पक्षात उपरे ठरविल्या गेलेले भारसाकळे कोण आहेत? पक्षातच त्यांना संघर्ष का करावा लागला? याचा घेतलेला हा आढावा. (read unknown facts about mla prakash bharsakale)

कौटुंबीक पार्श्वभूमी

प्रकाश गुणवंतराव भारसाकळे हे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील बनोसा येथील शिवाजी नगरात राहतात. दहावी नापास असलेले 64 वर्षीय भारसाकळे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. अकोट हा त्यांचा मतदारसंघ असून भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. यांच्या पत्नी ह्या सुद्धा दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. तर त्यांचा मुलगा जिनिंग प्रेसिंगचा कारभार सांभाळतो.

शिवसेनेपासून राजकीय कारकिर्दीस सुरुवात

भारसाकळे यांच्या राजकीय इनिंगला शिवसेनेतून सुरुवात झाली. त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशाही गावपातळीवरील राजकारणापासून झाली. त्यांनी पंचायतराज समितीचं अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. भारसाकळे हे 1990, 1995, 1999, 2004 मध्ये सलग शिवसेनेच्या तिकिटावर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून विजयी झाले होते.

राणेंचं बंड आणि काँग्रेस

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2005 मध्ये भारसाकळे यांनीही राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण काँग्रेसमध्ये ते जास्त काळ रमले नाहीत. 2009 च्या निवडणुकीत दर्यापूर अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना अकोटमधून तिकीट नाकारलं. त्यामुळे नाराज झालेल्या भारसाकळेंनी बंड पुकारलं आणि अकोटमधून अपक्ष निवडणूक लढवली होती.

भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागलेल्या भारसाकळेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014च्या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिलं आणि ते विजयीही झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश भारसाकळे 32 हजार मतांनी विजयी झाले होते.

पक्षातच उपरे

2019च्या निवडणुकीत पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी भारसाकळेंना प्रचंड संघर्ष करावा लागला. कारण भाजपमधील अकोटच्याच काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना उपरे ठरवून त्यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं. भारसाकळेंनी मागच्या पाच वर्षांत मतदार संघाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी केला होता. ते निष्क्रिय असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे भारसाकळेंना तिकीट मिळणार की नाही? याबाबत शंका निर्माण झाली होती. तिकीट मिळविण्यासाठी त्यांना जंगजंग पछाडावा लागलं होतं. अखेर या सर्वांवर मात करत त्यांना तिकीट मिळालं.

धमकीचं पत्रं

20 फेब्रुवारीच्या दरम्यान प्रकाश भारसाकळे यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी एका अज्ञात बिहारी नामक व्यक्तीने हिंदीमध्ये पत्र पाठवून पाच कोटी रुपये 28 फेब्रुवारीपर्यंत देण्यात यावी, अशी धमकी दिली. पैसे द्या अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारू, अशी धमकी त्या पत्रात देण्यात आली आहे. या पत्राच्या आधारे 21 फेब्रुवारी रोजी दर्यापूर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (read unknown facts about mla prakash bharsakale)

संबंधित बातम्या:

विद्यार्थी नेता ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते; वाचा, प्रवीण दरेकर यांच्या आयुष्यातील ‘खाचखळगे’!

‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’ ते ‘शिवसेनेची रणरागिणी’, कोण आहेत नीलम गोऱ्हे?; वाचा सविस्तर

ठाकरे कुटुंबीयांसोबत जमीन खरेदीत भागिदारी?; कोण आहेत रवींद्र वायकर वाचा सविस्तर!

प्रवीण दरेकरांमुळे पुन्हा चर्चेत आलेलं मुंबै बँक घोटाळा प्रकरण काय आहे?, काय आहेत दरेकरांवर आरोप; वाचा स्पेशल रिपोर्ट

डोक्यात पंप हाणू म्हणणाऱ्या आमदार राम सातपुतेंवर स्पेशल रिपोर्ट; वाचा सविस्तर!

(read unknown facts about mla prakash bharsakale)

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.