Who is Anil Deshmukh: वाझेप्रकरणामुळे गृहमंत्रीपद गेलं, कोण आहेत अनिल देशमुख?

स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून परिचित असलेले गृहमंत्री अनिल देशमुख आता नव्याच वादात सापडले आहेत. (know details about the home minister anil deshmukh)

Who is Anil Deshmukh: वाझेप्रकरणामुळे गृहमंत्रीपद गेलं, कोण आहेत अनिल देशमुख?
anil deshmukh

मुंबई: स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून परिचित असलेले गृहमंत्री अनिल देशमुख आता नव्याच वादात सापडले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटींची वसूली करण्याचं टार्गेट देशमुख यांनी दिले होते, असा आरोप होमगार्डचे प्रमुख परमबीर सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्याने अखेर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. (know details about the home minister anil deshmukh)

शेतकरी, बहुजनांसाठी लढणारा नेता

अनिल देशमुख हे 70 वर्षाचे आहेत. त्यांनी एम.एसस्सीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. नागपूरमधील काटोल हा त्यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून ते पाचवेळा निवडून आले आहेत. स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू समजले जातात. शेतकरी, बहुजनांसाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि…

नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळल्यानंतर देशमुख यांनी 1995मध्ये अपक्ष निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. पहिल्याच टर्ममध्ये युती सरकारमध्ये ते मंत्रीही झाले. देशमुखांकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य या खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.

राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन 1999मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी अनिल देशमुख यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी लगेच 1999मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर काटोलमधून निवडणूक लढवली आहे. विजयी झाले. त्यानंतर 2004मध्येही याच मतदारसंघातून त्यांनी विजयाची हॅट्रीक केली.

तगडा मुकाबला

2014ची विधानसभा निवडणूक अनिल देशमुखांसाठी ही सर्वात टफ होती. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात काटोलमधून आशिष देशमुख होते. आशिष देशमुख हे त्यावेळी भाजपमधून काटोलमधून लढले होते. देशमुख विरुद्ध देशमुख अशी ही लढत नागपूरमध्ये चांगलीच गाजली होती. मात्र, या निवडणुकीत अनिल देशमुख यांनी सहज विजय मिळविला. त्यानंतर 2019च्या निवडणुकीतही राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट देण्यात आले आणि देशमुखांनी या निवडणुकीतही बाजी मारली.

कायम मंत्रीपद

देशमुख पहिल्यांदा 1995मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले. अपक्ष आणि पहिल्याच टर्मचे आमदार असूनही युती सरकारमध्ये त्यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर देशमुख यांनी मागे वळून पाहिलं नाही. 2014 ते 2019 हा काळ वगळल्यास देशमुख यांच्याकडे कायम मंत्रिपद राहिलंय. राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी देण्यात आली. 1999 ते 2001 या काळात शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क विभागाचे राज्यमंत्रिपद, 2004 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यानंतर 2009 मध्ये अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार त्यांनी सांभाळला.

राष्ट्रगीताची सक्ती ते गुटखा बंदी

मंत्री म्हणून देशमुख यांनी धडाकेबाज निर्णय घेतले. त्यामुळे त्याची चर्चाही झाली. सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनी सिनेमागृहात राष्ट्रगीत सक्तीचं केलं होतं. अन्न व औषधीद्रव्य मंत्री असताना गुटखाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाची राज्यभर चर्चा झाली होती. ते बांधकाम मंत्री असतानाच वांद्रे-वरळी सी लिंक बांधून पूर्ण झाला होता.

लॉकाडाऊन आणि देशमुख

लॉकडाऊनच्या काळात देशमुखांनी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं. राज्यभरातील पोलीस ठाण्यांना भेटी देऊन त्यांनी पोलिसांचं मनोबल वाढवलं. एखादा पोलिसाचा वाढदिवस साजरा कर, त्यांचा सत्कार कर, आजारी पोलीस कर्मचाऱ्याची विचारपूस कर, चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो ट्विट करून त्यांचं कौतुक कर… आदी गोष्टींवर त्यांनी भर देऊन पोलिसांचं मनोधैर्य वाढवलं. या काळात ते सतत पोलिसांच्या संपर्कात होते. केवळ कार्यालयात बसून न राहता ग्राऊंडवर जाऊन ते पोलिसांशी संवाद साधत होते. (know details about the home minister anil deshmukh)

परमबीर सिंगांचे आरोप काय?

परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे. वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहीलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल. त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले. आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो, असं सिंग यांनी म्हटलं होतं.

भूषविलेली मंत्रिपदे

1995 – कॅबिनेट मंत्री, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य (युती सरकार)
1999 – राज्यमंत्री, शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क (आघाडी सरकार)
2001 – कॅबिनेट मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषधीद्रव्य प्रशासन (आघाडी सरकार)
2004 – कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक बांधकाम (आघाडी सरकार)
2009 – कॅबिनेट मंत्री, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण (आघाडी सरकार) (know details about the home minister anil deshmukh)

 

संबंधित बातम्या:

सहकार ते राजकारण; जाणून घ्या कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील?

पँथर ते काँग्रेस… नितीन राऊतांचा सामाजिक, राजकीय संघर्ष माहीत आहे का?

मूळचे शिवसैनिक, भाजपचे कट्टर विरोधक; अशी आहे विजय वडेट्टीवारांची राजकीय कारकिर्द

शिवसेनेचे ‘संकटमोचक’ आणि ठाकरेंचे विश्वासू; वाचा, अनिल परब यांचा पॉलिटिकल ग्राफ!

(know details about the home minister anil deshmukh)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI