नाना पटोलेंचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षपदी आता कोण ?

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

नाना पटोलेंचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षपदी आता कोण ?

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरुवारी संध्याकाळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता लवकरच त्यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत चर्चा सुरु होती. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही पद सोडण्याची तयारी जाहीररित्या बोलून दाखवली होती. दरम्यान, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.(Who is the Speaker of the Assembly after the resignation of Nana Patole?)

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण राजीनामा दिल्याचं सांगितलं. तसंच आपल्याला अद्याप नव्या जबाबदारीबाबत कळवण्यात आलेली नाही. मला फक्त विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश हायकमांकडून आले होते. त्याचं मी पालन केलं, असं पटोले म्हणाले. नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही.

नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार?

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोण होणार? पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावर बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांचे नेते याबाबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतील, असं पटोले यांनी सांगितलं आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा आहे.

विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला?

काँग्रेस आणि शिवसेनेत देवाणघेवाणीची प्राथमिक चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसनं उपमुख्यमंत्रीपदामध्ये रस दाखवल्याचं कळतंय. त्यासाठी शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी एक वर्षापूर्वी अस्तित्वात आली. तेव्हा सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत, ते संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करतो, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काही फेरबदल होऊन शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळेल का? याबाबत अद्याप कुणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही.

संबंधित बातम्या :

नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य

माझी छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील म्हणणारे नरहरी झिरवाळ हंगामी अध्यक्ष

नाना पटोलेंनी राजीनामा दिला; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं?

Who is the Speaker of the Assembly after the resignation of Nana Patole?

Published On - 6:03 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI