Governor : नवे सरकार, नवी यादी, विधान परिषदेच्या 13 जागांवर कुणाची लागणार वर्णी?

महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच तीन पक्षाने मिळून 12 आमदारांच्या निवडीसाठी यादी ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचाकडे पाठवली होती. मात्र, गेल्या दीड वर्षात हा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नव्हता. शिवाय यावरुन भाजपावर आणि कोश्यारी यांच्यावर टिकाही झाली. मात्र, आजही तो प्रश्न कायम आहे. आता शिंदे सरकारची स्थापना झाली आहे.

Governor : नवे सरकार, नवी यादी, विधान परिषदेच्या 13 जागांवर कुणाची लागणार वर्णी?
राज्यपालांकडून 12 विधानपरिषदेच्या आमदारांची निवड केली जाते.
राजेंद्र खराडे

|

Jul 02, 2022 | 4:30 PM

मुंबई : (MVA) महाविकास आघाडी सरकार पडलं तरी (Governor) राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लागलाच नव्हता. याची कारणे सर्वांना माहितीच आहेत पण आता या आमदारांच्या निवडीसाठी पोषक असलेल्या सरकारची स्थापना झाली असल्याने 12 आमदारांच्या निवडीचा प्रश्न मार्गी लागेल असे चित्र आहे. त्यामुळे राज्यपालाच्या माध्यमातून निवडले जाणारे 12 आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे विधानपरिषदेवरील त्या एका जागेवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्याअनुशांने (Eknath Shinde) शिंदे सरकारकडून नवी यादी राज्यपालांना देण्यात येणार आहे. बदललेली सत्तेची समीकरणे आणि कुणाचीही नाराजी होऊ नये याअनुशंगााने सर्वतोपरी काळजी घेऊनच ही यादी राज्यपालांकडे सपूर्द केली जाणार आहे. शिंदे गट, भाजपा याच बरोबर घटक पक्षाला देखील समोर ठेऊन ही यादी तयार केली जाणार आहे.

अडीच वर्षापासून रखडली निवड

महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच तीन पक्षाने मिळून 12 आमदारांच्या निवडीसाठी यादी ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचाकडे पाठवली होती. मात्र, गेल्या दीड वर्षात हा प्रश्न मार्गी लावण्यात आलेला नव्हता. शिवाय यावरुन भाजपावर आणि कोश्यारी यांच्यावर टिकाही झाली. मात्र, आजही तो प्रश्न कायम आहे. आता शिंदे सरकारची स्थापना झाली आहे. आमदारांच्या संख्येत भर पडण्याच्या अनुशंगाने या संभाव्य आमदारांची यादी राज्यपालांकडे दिली जाणार असून गेल्या अडीच वर्षापासून रखडेलला प्रश्न आता तरी मार्गी लागेल असा आशावाद आहे.

कुणाला मिळणार संधी?

राज्यपालांकडून विधानपरिषदेवर 12 आमदारांची निवड केली जाते. शिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ती जागा एक अशा 13 आमदारांची निवड होणार आहे. विधानपरिषदेला भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्या नावाची केवळ चर्चा झाली. आता पुन्हा त्यांच्या नावाची चर्चाच होणार का पक्ष त्यांचेही नाव पुढे करणार हे पहावे लागणार आहे. सध्या एकानाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी यामध्ये भाजपाच्याच आमदारांची संख्या जास्तीची असणार आहे. यामध्ये सदाभाऊ खोत, माधव भांडारी,विनायक मेटे,चित्रा वाघ, राजेश क्षीरसागर यांच्यासह आठवले गटातील एक अशी नावे चर्चेत आहेत.

हे सुद्धा वाचा

घटक पक्षाला समावून घेण्याचे आव्हान

भाजपाच्या मदतीने सध्या शिंदे सरकार सत्तेत असल्याने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली निघणार यामध्ये शंका नाही. यामध्ये भाजप पक्षाचे आणि त्यांच्या घटक पक्षातील उमेदवारांचीच अधिकची नावे असणार आहेत. आठवले गटासह इतरांनाही संधी देण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर शिंदे गटातून काही नावे समोर येतील का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें