AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण होणार तीन महिन्यांचा आमदार?

नागपूर : निवडणुकीसाठी अर्ज भरा, गावोगावी फिरुन प्रचार करा, या सर्व प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च करा. एवढं सारं करुन तीन महिन्यांसाठी आमदार होण्यासाठी फारसं कुणी उत्सुक नसतं. अगदी तिच परिस्थिती काटोल विधानसभेतील  पोटनिवडणुकीत आहे. 11 एप्रिलला काटोल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मे महिन्याच्या शेवटी निकाल लागेल. आणि राज्यातालील विधानसभा निवडणूक सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता […]

कोण होणार तीन महिन्यांचा आमदार?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

नागपूर : निवडणुकीसाठी अर्ज भरा, गावोगावी फिरुन प्रचार करा, या सर्व प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च करा. एवढं सारं करुन तीन महिन्यांसाठी आमदार होण्यासाठी फारसं कुणी उत्सुक नसतं. अगदी तिच परिस्थिती काटोल विधानसभेतील  पोटनिवडणुकीत आहे. 11 एप्रिलला काटोल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मे महिन्याच्या शेवटी निकाल लागेल. आणि राज्यातालील विधानसभा निवडणूक सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे काटोलच्या नव्या आमदाराला फक्त तीन महिने कार्यकाळ मिळणार आहे. त्यामुळेच या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाचे नेते फारसे उत्सुक दिसत नाही.

भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे काटोलमध्ये पोटनिवडणूक होत आहे. आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेली काटोलची जागा ही माजी मंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे. तर युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. इथे राष्ट्रवादीचं पारडं जड असलं तरीही अनिल देशमुखही तीन महिन्यासाठी आमदारकी लढवण्यास फारसे इच्छुक दिसत नाहीत. त्यामुळे सर्व पक्षांनी मिळून यावर विचार करावा आणि पर्याय काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

काटोल विधानसभा

नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघावर महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कायम काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र1995 साली अनिल देशमुख अपक्ष म्हणून आणि पुढे तेच अनिल देशमुख राष्ट्रवादीकडून जिंकत गेले. त्यामुळे पुढे काटोल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरला. मात्र 2014 साली डॉ. आशिष देशमुखांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातून काटोल खेचून आणलं आणि जिंकले. मात्र, विदर्भाचा मुद्दा, शेतकऱ्यांचा मुद्दा इत्यादी मुद्द्यांवरुन डॉ. आशिष देशमुख यांनी राजीनामा दिला.

डॉ. आशिष देशमुखांचा राजीनामा

डॉ. आशिष देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे सुपुत्र आहेत. अत्यंत उच्चशिक्षित असलेले डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपकडून विधानसभा लढवली आणि जिंकलेही. मात्र, विदर्भातील विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी सत्ताधारी स्वपक्षावरच नाराजी व्यक्त केली आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काटोल विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?