ग्रामविकास मंत्री म्हणून माझं हे शेवटचं प्रदर्शन, अशा पंकजा मुंडे का म्हणाल्या?

ग्रामविकास मंत्री म्हणून माझं हे शेवटचं प्रदर्शन, अशा पंकजा मुंडे का म्हणाल्या?

मुंबई : ग्रामविकास खात्याची मंत्री म्हणून हे (महालक्ष्मी सरस) माझं शेवटचं प्रदर्शन आहे. माहित नाही, यापुढे माझ्याकडे कुठला कारभार असेल, अशा भावना राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. वांद्र्यातील एमएमआरडीए ग्राऊंडवर आयोजित महालक्ष्मी सरसचं महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

“ग्रामविकास खात्याची मंत्री म्हणून हे माझं शेवटचं प्रदर्शन आहे. माहित नाही, यापुढे माझ्याकडे कुठला कारभार असेल. सरकार आमचंच येणार हे नक्की आहे. पुन्हा मला याच विभागाचं काम करायला आवडेल.”, असे ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुडे यांनी महालक्ष्मी सरस प्रदर्शनावेळी म्हटले.

“महालक्ष्मी सरसमध्ये बचतगट सहभागी झाले असून, 511 स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. मुंबईकरांनी प्रदर्शनास भेट देऊन ग्रामीण महिला बचतगट आणि कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, तसेच त्यांच्या नानाविध अशा कलाकुसरी, उत्पादनांची खरेदी करावी.” असे आवाहनही यावेळी पंकजा मुंडे यांनी केले.

पंकजा मुंडे यांच्याकडे सध्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण अशी दोन मंत्रिपदं आहेत. महिला व बालकल्याण मंत्री या नात्याने पंकजा मुंडे यांनी महालक्ष्मी सरसमध्ये उपस्थिती लावली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI