वर्ध्यातील मोदींच्या पहिल्या प्रचारसभेला नितीन गडकरी का नव्हते?

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा वर्धा जिल्ह्यात घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे बडे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात मोदींची पहिलीच प्रचारसभा आणि तीही विदर्भातील वर्धा जिल्ह्यात होती. मात्र, तरीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गैरहजर होते. …

वर्ध्यातील मोदींच्या पहिल्या प्रचारसभेला नितीन गडकरी का नव्हते?

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा वर्धा जिल्ह्यात घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे बडे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात मोदींची पहिलीच प्रचारसभा आणि तीही विदर्भातील वर्धा जिल्ह्यात होती. मात्र, तरीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गैरहजर होते. त्यामुळे गडकरींच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा वर्ध्यात रंगली.

नितीन गडकरी हे विदर्भातील सर्वात मोठे नेते आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भात येत असल्याने, त्यांच्या सभेला नितीन गडकरी हजर राहतील, असा अंदाज होता. मात्र, नितीन गडकरी हे वर्ध्यात मोदींच्या सभेला गेलेच नाहीत.

नितीन गडकरी हे आपल्या प्रचारासाठी नागपुरातच वेगवेगळ्या सभा घेत आहेत. आज त्यांनी नागपूरच्या कलावंतांना संबोधित करण्यासाठी सभा घेतली आणि मतदान करण्याची विनंती सुद्धा केली.

जनतेनं मतदानाआधीच अनेकांना मैदान सोडून पळवलंय, मोदींचा पवारांना टोला

“कलावंत अनेक वेळा आर्थिक अडचणीला समोर जातात. अनेक प्रश्न आहेत. कलाकार वंचित राहू नये, त्यांना आपली कला सादर करता यावी, यासाठी रंगमंचाची गरज असते. नागपुरात भट सभागृह निर्माण करण्यात आलं. त्याचा फायदा कलावंतांना होत आहे. आता अंबाझरीमध्ये ओपन थेटर निर्माण केलं जातं आहे. त्यात 30 हजारची क्षमता असेल, मला कलावंत आणि त्यांच्या कलेवर प्रेम आहे. त्यांच्यासाठी बरंच काही करायचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे.” असे नितीन गडकरी कोल्हापुरात म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यातील सभेत काय म्हणाले?

– इस्रोच्या शास्त्रज्ञांचं सर्वप्रथम अभिनंदन, त्यांनी काही वेळापूर्वीच अंतराळात उपग्रह सोडून यशस्वी कामगिरी केलीय – नरेंद्र मोदी
– वर्ध्यातून महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात करायला मिळालं, हे माझं भाग्य – नरेंद्र मोदी
– वर्ध्यातील लोकांचं प्रेम पाहता, माहित नाही या काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय होईल? – नरेंद्र मोदी
– महाराष्ट्रासाठी मी जे काही केलंय, त्यामागे तुम्हा सर्वांची शक्ती आहे – नरेंद्र मोदी
– काँग्रेसने गांधीजी आणि विनोबांचे विचार किती अवलंबले, याचं वास्तव तुम्हाला चांगलं माहित आहे – नरेंद्र मोदी
– काँग्रेसवाल्यांनो, तुमची शिवी माझ्यासाठी दागिना आहे – नरेंद्र मोदी
– शौचालय काँग्रेससाठी मस्करीचा विषय असेल, मात्र माझ्यासाठी माझ्या माता-भगिणींसाठी इज्जतीचा विषय आहे – नरेंद्र मोदी
– जनतेने यावेळी मतदानाआधीच अनेकांना मैदान सोडून पळवलंय, नरेंद्र मोदींचा शरद पवारांना टोला
– पवारांच्या हातून पक्ष निसटतोय, पुतणे अजित पवार पक्षावर पकड वाढवतायेत – नरेंद्र मोदी
– दुष्काळालाही काँग्रेसच जबाबदार – नरेंद्र मोदी
– काँग्रेस-राष्ट्रवादीने शहिदांचा अपमान केला – नरेंद्र मोदी
– आझाद मैदानात हिंसा करणाऱ्यांवर कारवाई केली गेली नाही, याचं कारण काँग्रेस-राष्ट्रवादीची व्होटबँक – नरेंद्र मोदी
– हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला? – नरेंद्र मोदी
– काँग्रेसने हिंदूंना अपमानित करण्याचं काम केलंय – नरेंद्र मोदी
– काँग्रेसने ज्या हिंदूंना दहशतवाद म्हटलं, ते आता जागे झालेत – नरेंद्र मोदी
– काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला – नरेंद्र मोदी
– काँग्रेस-राष्ट्रवादीला एकही सीट मिळू देऊ नका – नरेंद्र मोदी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *