संजय राठोड यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी पत्नीचा आटापिटा?

संजय राठोड यांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं (Wife Sheetal Rathod Sanjay Rathod)

संजय राठोड यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी पत्नीचा आटापिटा?
शीतल राठोड आणि संजय राठोड

मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळातील पहिली विकेट पडली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या वर्षा निवासस्थानी सपत्नीक भेट देत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. पोहरादेवीचं शक्तिप्रदर्शन असो किंवा राजीनाम्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट, संजय राठोड यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी पत्नी शीतल राठोड आटापिटा करताना दिसल्या. (Wife Sheetal Rathod supported Sanjay Rathod to save his Ministry)

सपत्नीक भेटण्यामागे कारण काय?

संजय राठोड यांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. पूजा चव्हाण प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं राठोड हे पत्नीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं गेलं. परंतु राठोड दाम्पत्याच्या भेटीनंतरही मुख्यमंत्र्यांचं मत बदललं नाही. कारण मुख्यमंत्र्यांना संजय राठोड यांनी राजीनामा दिला.

पोहरादेवी दौऱ्यातही साथ

संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्यातही पत्नी शीतल राठोड यांनी खंबीर साथ दिल्याचं दिसलं होतं. जवळपास दोन आठवडे नॉट रिचेबल राहिलेल्या संजय राठोड यांची पहिली झलक 23 फेब्रुवारीला यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांनी टिपली, त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शीतल राठोड होत्या.

शीतल राठोड यांना भोवळ आलेली

पोहरादेवी गडावर दर्शनासाठी गेले असताना यवतमाळ ते वाशिम प्रवासात संजय राठोड यांच्यासोबत पत्नी शीतल राठोड (Sheetal Rathod) होत्या. पोहरादेवी गडावर संजय राठोड समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीतून वाट काढत पायथ्यापासून गाभाऱ्यापर्यंत राठोड पती-पत्नी पोहोचले. समर्थकांची प्रचंड गर्दी असल्यामुळे संजय राठोड आणि पत्नी शीतल राठोड यांना पुढे चालणंही कठीण होत होतं. त्यावेळी शीतल राठोड या स्वत: गर्दी पांगवत होत्या. प्रचंड गर्दी, त्यामध्ये तोंडाला मास्क आणि डोक्यावर तळपता सूर्य, त्यामुळे शीतल राठोड यांना भोवळही आली होती.

वर्षा बंगल्यावर आज काय घडलं?

चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास एकनाथ शिंदे यांनी विरोध केला. राठोड यांनी पोहरादेवीच्या महंतांशी बोलण्याची विनंती केली, परंतु मुख्यमंत्र्यांनी चर्चेला नकार दिला. विशेष म्हणजे पोहरादेवीवर जमलेल्या गर्दीविषयीही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातं. मला माझा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती. त्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी स्वीकारल्याचं वृत्त बाहेर आलं.

संजय राठोड काय म्हणाले?

“मी माझा राजीनामा मा. मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. मात्र अनेक दिवसांपासून  विरोधी पक्षांनी प्रसारमाध्यम, समाज माध्यमातून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मीडियातून माझ्या समाजाची, माझी वैयक्तिक  बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार घडला. गेली तीस वर्ष मी केलेलं राजकीय आणि सामाजिक काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं, ही माझी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना हे सांगून मी राजीनामा दिला” अशी पहिली प्रतिक्रिया संजय राठोड यांनी राजीनाम्यानंतर दिली. (Wife Sheetal Rathod supported Sanjay Rathod to save his Ministry)

आमदारकीचा राजीनामा नाही

“माझ्यासोबत अनिल परब, अनिल देसाई होते, मी सध्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आमदारकीचा राजीनामा दिला नाही. चौकशीनंतर परिणाम भोगायला पाहिजे होते, परंतु विरोधकांनी उद्या अधिवेशन चालू देणार नाही, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे, परंतु विरोधी पक्षांनी संसदीय कार्य चालू देणार नाही, असं म्हटलं, म्हणून पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला” असंही संजय राठोड यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

प्रवास, गर्दी ते तोंडाला मास्क, पोहरादेवी गडावर संजय राठोडांच्या पत्नीला भोवळ!

(Wife Sheetal Rathod supported Sanjay Rathod to save his Ministry)

Published On - 5:00 pm, Sun, 28 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI