AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC election 2022 Ram Nagar WARD 127 : प्रभाग क्रमांक 127 मध्ये पुन्हा तुकाराम कृष्णा पाटीलच बाण मारणार?

प्रभाग क्रमांक 127 हा गेल्या निवडणूकीत सर्व साधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षीत झाला होता. त्यावेळी तुकाराम कृष्णा पाटील हे नगरसेवक म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

BMC election 2022 Ram Nagar WARD 127 : प्रभाग क्रमांक 127 मध्ये पुन्हा तुकाराम कृष्णा पाटीलच बाण मारणार?
प्रभाग क्रमांक 127Image Credit source: tv9
| Updated on: Jun 07, 2022 | 10:03 PM
Share

BMC election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणूकीचा (BMC municipal 2022) बिगूल वाजला असून प्रत्येक वार्डात इच्छूक आपल्या कामाला लागले आहेत. तर ज्यांचा प्रभाग बदलला आहे किंवा आरक्षण बदलला आहे. त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे अनेक प्रभागात प्रस्थापितांना धक्का बसला असून अनेकांना प्रभाग आरक्षण लॉटरीमध्ये लॉटरीच लागली आहे. यामुळे अनेक माजी नगरसेवकांना पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. अशीच संधी प्रभाग क्रमांक 127 चे शिवसेनेचे माजी नगरसेवक तुकाराम कृष्णा पाटील (Former Councilor Tukaram Krishna Patil) यांना मिळण्याची शक्यता आहे. पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिल्यास ते निवडणूकीत उतरू शकतात. कारण गेल्या निवडणूकीत म्हणजे 2017 मध्ये हा प्रभाग सर्व साधारण खुला होता. त्याचप्रमाणे याही वेळी सर्व साधारण खुला गटासाठी आरक्षण पडलं आहे. त्यामुळे बीएमसी निवडणूकीत प्रभाग क्रमांक 127 (WARD 127) मध्ये पुन्हा तुकाराम कृष्णा पाटीलच बाण मारणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

प्रभाग क्रमांक 127 च्या सीमा

उत्तर: प्रभाग क्रमांक 123 (नाळा, साईनाथ पुत्रन मार्ग) पूर्व: प्रभाग क्रमांक 126 (सेलिन डिसिल्वा रोड, गोळीबार रोड) दक्षिण: वॉर्ड क्र.128, 130 (अंधेरी-घाटकोपर लिंक रोड) पश्चिम: प्रभाग क्रमांक 128 (आर.बी. कदम रोड, गजानन महाराज मंदिर रोड)

2017 मध्ये प्रभाग क्रमांक 127 चे उमेदवार

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

प्रभाग क्रमांक 127 सर्व साधारण खुला

प्रभाग क्रमांक 127 हा गेल्या निवडणूकीत सर्व साधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षीत झाला होता. त्यावेळी तुकाराम कृष्णा पाटील हे नगरसेवक म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यावेळी प्रभाग क्रमांक 127 मध्ये एकूण लोकसंख्या ही 52521 होती. ज्यात अनुसूचित जातीचे 3797 आणि STची 739 संख्या होती.

अनेकांना धक्का दिला

2017 मध्ये प्रभाग क्रमांक 127 हा प्रभाग सर्व साधारण खुला होता. त्यामुळे अनेकांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून जाण्यासाठी आपले नशीब आजमावले होते. त्यासाठी अनेकांनी आपली कंबर कसली होती. त्यावेळी प्रभाग क्रमांक 127 वर तब्बल 22 जनांनी आपला हक्क सांगत मैदान मीच मारणार अशी भीम गर्जना केली होती. मात्र तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत 22 जनांना धक्का दिला होता. आणि तुकाराम पाटील 8596 मते घेत आपला विजय खेचून आणला होता.

2017 मध्ये प्रभाग क्रमांक 127 चे उमेदवार

गणेश भगत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 4458

चंद्रमणी चंद्रकांत जाधव (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) 425

केदारे ज्योती प्रमोद (बहुजन समाज पार्टी) 541

तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील (शिवसेना 8596 विजयी)

शाह केतन प्रफुल्ल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 2589

तावडे रितु राजेश (भारतीय जनता पार्टी) 4572

संजय मोतीराम (भारिप बहुजन महासंय) 559

कागदे जयराम हरिदास (संभाजी ब्रिगेड) 10

दत्ताराम नारायण कंक (अखिल भारतीय सेना) 27

पारखे राजेश मधुकर (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोरिया) 40

आहिरे दर्शन किसन (अपक्ष) 35

भोसले सुरेश महादेव (अपक्ष) 45

गोरे विजय विठ्ठल (अपक्ष 322

प्रकाश शंकर कांबळे (अपक्ष 79

सतीश संपत लॉखडे उर्फ (दादा) (अपक्ष 222

संतोष विठ्ठल साळुंके (अपक्ष) 42

संजय वासुदेव सावंत (अपक्ष) 64

नवनाथ शंकर शेजवळ (अपक्ष) 827

शेलार दिनेश दिलीप (अपक्ष) 104

श्रीकांत यशवंत सुर्वे (अपक्ष 30

पाताडे सचिन हरिचंद्र (अपक्ष) 69

पवार योगेश रघुनाथ (अपक्ष) 96

वरीलपैकी एकही नाही (NOTA) 252

एकूण मते 23004

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.