मावळमधून तिकिटासाठी राज्यमंत्री बाळा भेगडे मुलाखतीला हजर, तिघांमध्ये शर्यत!

भाजप नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मावळ विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या. यावेळी 20 जणांनी या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं सांगत मुलाखती दिल्या.

मावळमधून तिकिटासाठी राज्यमंत्री बाळा भेगडे मुलाखतीला हजर, तिघांमध्ये शर्यत!

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. भाजपनेही नावं निश्चित करण्यासाठी मुलाखती घेतल्या. भाजप नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मावळ विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या. यावेळी 20 जणांनी या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं सांगत मुलाखती दिल्या. यामध्ये कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांचाही समावेश होता. राज्यमंत्री बाळा भेगडेंनी तिकिटासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मुलाखत दिली.

मावळ विधानसभा मतदारसंघात आरएसएसची ताकद मोठी आहे. भाजपाचा मोठा मतदार इथे आहे. त्यामुळे ज्याला तिकीट मिळेल तो विजयी होईल असा समज इच्छुकांमध्ये आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये युतीला भरघोस मतदार झालं.  इथे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पराभव केला.

आता विधानसभेला या मतदारसंघात बाळा भेगडे यांनाच तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र तरीही भाजपची संसदीय समितीच उमेदवार ठरवेल, असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.

बाळा भेगडे हे सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. दोन टर्म आमदार असलेल्या भेगडे यांची नुकतीच राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यांनी पुन्हा एकदा इथे दावेदारी सांगितली आहे. मात्र सुनील शेळके आणि रवी भेगडे या दोघांनीही या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *