चंद्रकांत पाटलांनी श्रीफळ वाढवले, पुण्यातून विद्यार्थ्यांच्या दोन बस कोल्हापूरला रवाना

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरुन विद्यार्थ्यांच्या दोन बस कोल्हापूरच्या दिशेला रवाना झाल्या आहेत (Chandrakant Patil help students). या दोन बसमार्फत एकूण 60 विद्यार्थी आपल्या गावी गेले.

चंद्रकांत पाटलांनी श्रीफळ वाढवले, पुण्यातून विद्यार्थ्यांच्या दोन बस कोल्हापूरला रवाना

पुणे : पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरुन विद्यार्थ्यांच्या दोन बस कोल्हापूरच्या दिशेला रवाना झाल्या आहेत (Chandrakant Patil help students). या दोन बसमार्फत एकूण 60 विद्यार्थी आपल्या गावी गेले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही बसचं नियोजन केलं. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी आज (10 मे) दुपारी नारळ वाढवले आणि त्यानंतर या बस कोल्हापूरच्या दिशेला रवाना झाल्या. भाजपच्या ‘घर चलो’ अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला (Chandrakant Patil help students).

“आम्ही सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने मदत करत आहोत. राज्यात भाजपनं तब्बल 90 लाख लोकांना दहा दिवस पुरेल एवढं धान्य दिलं. त्याचबरोबर मास्कसह इतर गरजेच्या वस्तू दिल्या”, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

“प्रशासनाला अपेक्षित असेल तेव्हा मी सूचना देतो ते बदल करतात. काही भागांमध्ये कोरोना नियंत्रणात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन थोडं शिथल करावं लागेल. लोक कासाविस झाले आहेत. त्यामुळे हळूहळू त्यांची आपापल्या गावी जाण्याची व्यवस्था केली पाहिजे. परराज्यातील नागरिकांना रेल्वेमार्फत आपापल्या राज्यात पाठवण्यात येत आहे”, असंदेखील चंद्रकात पाटील म्हणाले.

“राज्य सरकारने विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासंदर्भात वेगवेगळी भूमिका घेतली. अगोदर डबल भाडे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता एसटीने मोफत सोडण्याचा निर्णय घेतला. घरी सोडण्यासाच्या नियोजनात थोडा वेळ लागतोय. पण आम्ही आमची ताकद लावली आहे”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“आतापर्यंत आम्ही आठ बस तेलंगणात पाठवल्या आहे. तर आठ बस गोंदियाला पाठवल्या आहेत. याशिवाय दोन बस कोल्हापूरला सोडल्या आहेत. पुढील सात दिवसांत दोन हजार बस सोडण्याचे लक्ष्य आहे”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. “काही विद्यार्थी आम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांना सांगितलं की, हे पैसे पीएम किंवा सीएम केअर फंडला द्या”, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *