Corona Update | कोरोनाची लस किमान सहा महिने तरी बाजारात येणार नाही : आदर पूनावाला

आजपासून किमान सहा महिने तरी लस बाजारात येणार नाही, असं सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितलं.

Corona Update | कोरोनाची लस किमान सहा महिने तरी बाजारात येणार नाही : आदर पूनावाला

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यासह देशभरात (Corona Virus Vaccine) सर्वत्र वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष कोरोना नियंत्रण करणाऱ्या लसीकडे लागलं आहे. काही कंपन्यांची लस 15 ऑगस्टपूर्वी येणार असल्याचा दावा केला. यासंदर्भात सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड एकत्र संशोधन करत आहे. मात्र, आजपासून किमान सहा महिने तरी लस बाजारात येणार नाही, असं सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितलं (Corona Virus Vaccine).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पुण्यात मायलॅबने आरटी पीसीआर टेस्ट करणाऱ्या नवीन मशीनच्या लॉन्चिंगवेळी सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला बोलत होते. कोव्हिडची टेस्ट करण्यासाठी उपयुक्त आहे. कोरोनासह एचआयव्ही, टीबी, कॅन्सर, काही अनुवांशिक आजार यासाठी आरटी पीसीआर टेस्टच माध्यम वापरलं जातं. माय लॅबने बनवलेल्या या नवीन मशीनचा नाव कॅम्पाक्त एक्सएल आहे. या मशीनमुळे एका दिवसात 400 कोव्हिड टेस्ट होणं शक्य होणार आहे. एका वेळेस 32 सॅम्पल या मशीनमध्ये बसतात. तसेच, ही मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक असून टेस्टसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची गरजही कमी आहे.

मायलॅबमध्ये सिरम इन्स्टिट्यूटनेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. यावेळी बोलताना आदर पूनावला यांनी यंदाच्या वर्षाच्या शेवटी आमची लस ही तयार असेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

मध्यंतरी घाईगडबडीत वेळेच्या अगोदर लस बनवल्याच्या बातम्या होत्या. मात्र, आम्हाला कोणतीही घाईगडबड करायची नाही. आम्हाला सुरक्षित आणि अचूक लस विकसित करायची आहे. देशासाठी आणि जगासाठी सुरक्षित बनवल्यावर आम्ही त्या संदर्भात जाहीररित्या सांगू, असा आदर पूनावाला यांनी सांगितलं.

Corona Virus Vaccine

संबंधित बातम्या :

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर निर्णय

Lockdown | …तर पुण्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *