पुण्यातील 'ही' पाच रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांसाठी निश्चित

दिवसेंदिवस देशासह राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत (Pune covid hospital) आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला आहे.

पुण्यातील 'ही' पाच रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांसाठी निश्चित

पुणे : दिवसेंदिवस देशासह राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत (Pune covid hospital) आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. राज्यातील मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यापार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मिळून पाच रुग्णालये कोविड क्रिटिकल केअर रुग्णालय म्हणून निश्चित (Pune covid hospital) करण्यात आली आहेत.

पुण्यात जी पाच रुग्णालये कोविड क्रिटिकल केअर रुग्णालय म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये फक्त कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. पुण्यातील कोरोनाबाधितांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पुण्यात आतापर्यंत एकूण 320 कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये आतापर्यंत 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 19 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

पुण्यातील कोविड क्रिटिकल केयर रुग्णालये :

  • बी.जे. मेडिकल कॉलेज ससून रुग्णालय,
  • भारती विद्यापीठ रुग्णालय,
  • सिम्बॉयसिस रुग्णालय, लवळे
  • नायडू रुग्णालय, पुणे
  • यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालय पिंपरी

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 2684 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 178 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर 200 पेक्षा अधिक लोक कोरोनामुक्त झालेले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *